Bakrid 2022 Date in India: २०२२ मध्ये कधी साजरी होणार बकरीद, जाणून घ्या बकरीदचे महत्त्व

इस्लाम धर्मात बकरीद हा महत्त्वाचा सण आहे. हा सण यंदा १० जुलै २०२२ रविवारी रोजी साजरा होणार आहे. ईद उल फितरच्या ७० दिवसांनंतर बकरीद मुस्लिस बांधव साजरे करतात. हा सण कुर्बानीचा असून हा सण अल्लाच्या प्रति समर्पणाचे प्रतीक आहे. 

bakarid
बकरीद  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इस्लाम धर्मात बकरीद हा महत्त्वाचा सण आहे.
  • हा सण यंदा १० जुलै २०२२ रविवारी रोजी साजरा होणार आहे.
  • ईद उल फितरच्या ७० दिवसांनंतर बकरीद मुस्लिस बांधव साजरे करतात

Bakrid 2022 Date in India, Eid-Al-Adha Kab kadhi aahe bhartat: २०२२ मध्ये बकरीद कधी आहे ? : इस्लाम धर्मात बकरीद हा महत्त्वाचा सण आहे. हा सण यंदा १० जुलै २०२२ रविवारी रोजी साजरा होणार आहे. ईद उल फित्रच्या ७० दिवसांनंतर बकरीद मुस्लिस बांधव साजरे करतात. हा सण कुर्बानीचा असून हा सण अल्लाच्या प्रति समर्पणाचे प्रतीक आहे. (Bakrid 2022 importance and significance in india date bakrid bharatat kadhi aahe)

अधिक वाचा : Eid-e-Milad un Nabi Mubarak Wishes: ईद ए मिलाद उन नबीच्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून करा ईद मुबारक!

ईद-उल-अजहा हा दिवस हजरत इब्राहिमच्या कुर्बानीच्या आठवणीत साजरा केला जातो. हजरत इब्राहिम हे अल्लाच्या आदेशावर आपली निष्ठा दाखवण्यासाठी आपल्या मुलगा इस्माईलचा बळी देण्यासाठी तयार झाले होते. जेव्हा हजरत इब्राहिम आपल्या मुलाच्या कुर्बानीसाठी पुढे आले तेव्हा देवाने त्यांची निष्ठा पाहून इस्माईलची कुर्बानीचे रुपांतर बकर्‍याच्या कुर्बानीत केले आहे. इस्लामच्या धार्मिक मान्यतानुसार हजरत इब्राहिम अल्लाहचे पैंगबर होते.

अधिक वाचा : Eid Mubarak 2022 Images : रमजान ईदच्या शुभेच्छा WhatsApp Status, Images

भारतात बकरीद कधी आहे ?

२०२२ या वर्षी भारतात १० जुलै रोजी बकरीद साजरी केली जाईल. ईद उल अजहा इस्लामी दिनदर्शिकेनुसार १२ वा आणि शेवटचा महिना आहे. ह सण आनंद साजरा करण्याचा तसेच गोरगरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याचा सण आहे. कुर्बानी केलेले मांस हे गरीबांना वाटण्यात येतं. नमाज पठण केल्यानंतर बकरीची कुर्बानी दिली जाते आणि त्याचे मांस कुटुंबीयांतील सदस्य, शेजारी तसेच गरीबांना दिले जाते. ईद उल जुहाच्या वेळी मुस्लिम बांधव मशीदीत एकत्र येतात आणि नमाज पठण करतात. ही नमाज पहाटे पहाटे केली जाते.

अधिक वाचा : Eid Mubarak 2022 Messages: रमजान ईदच्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाईम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी