Ashok leaves benefits: कलशावर का लावतात अशोकाची पानं? हे पाच उपाय आणतील सुख आणि शांती

अशोकाच्या झाडाचा इतर कुठलाही फायदा होत नसल्यामुळे त्या झाडाला नेहमीच हिणवलं जातं. मात्र या झाडाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं सांगितलं जातं.

Ashok leaves benefits
कलशावर का लावतात अशोकाची पानं?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • अशोकाच्या झाडाचे अनेक फायदे
  • घरात येते सुख आणि शांती
  • अंगणात अशोकाचे झाड लावणे ठरते फायदेशीर

Ashok leaves benefits : कुठल्याही पूजेच्या (Pooja) वेळी अगोदर कलश मांडला जातो. कलशाचं पूजन केलं जातं आणि त्यानंतरच मुख्य पूजेला सुरुवात केली जाते. या कलशावर अशोकाच्या झाडाची पानं (Ashoka leaves) ठेवण्याची पद्धत आहे. ज्यांना अशोकाच्या झाडाची पाने मिळत नाहीत, ते त्याऐवजी आंब्याची किंवा इतर कुठलीही पाने कलशावर ठेवतात. मात्र मूळ परंपरेनुसार अशोकाच्या झाडांना कलशावर स्थान देण्यात आल्याचं या क्षेत्रातील काही तज्ज्ञ सांगतात. अशोकाच्या झाडाला इतर कुठलाही उपयोग (Benefits) नसल्याबद्दल नेहमीच हिणवलं जातं. मात्र या झाडाचं अध्यात्मिक महत्त्व प्रचंड असून त्यासाठी या झाडांच्या पानांचा वापर धार्मिक कार्यासाठी केला जात असल्याचं सांगितलं जातं. अशोकाच्या झाडाबाबत आणि त्याच्या पानांच्या उपयोगाबाबत अनेक कथा प्रसिद्ध आहेत. या पानांत दैवी शक्ती असून त्यात देवदेवता वास करतात, असं मानलं जातं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे या पानांचा उपयोग करून आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी आणि शांतता आणली जाऊ शकते, असा दावा करण्यात येतो. जाणून घेऊया असेच काही उपाय आणि त्यापासून होणारे फायदे. 

वातावरण होतं प्रसन्न

असं मानलं जातं की कलशावर अशोकाच्या झाडाची सात पानं ठेवल्यामुळे वातावरण प्रसन्न राहतं. जर तुमचं कौटुंबिक जीवन सुखी नसेल, तर अशोकाच्या पानांची मदत होते. कुटुंबात सतत भांडणं आणि हेवेदावे होत असतील तर अशोकाच्या झाडाची सात पानं देवाला अर्पण कऱण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते. 

अधिक वाचा - Daily Horoscope 22 September: आजचे राशीभविष्य; 'या' राशींसाठी आजचा दिवस शुभ, होईल भरभराट

वैवाहिक जीवनातील अडचणी

जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील किंवा लग्न ठरण्यात समस्या येत असतील, तर अशोकाच्या झाडाच्या पानांचा उपयोग करता येतो. अंघोळीच्या पाण्यात अशोकाच्या झाडाची पानं टाकून त्याने अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. अंघोळ झाल्यानंतर ही पानं पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन द्या. त्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल, असं सांगितलं जातं. 

अशोकाच्या पानांचं तोरण

अशोकाच्या झाडाचं तोरण करून ते दारावर बांधलं, तर घरात नकारात्मक ऊर्जा येण्यापासून रोखलं जातं. अशोकाची पानं घराचं संरक्षण करतात आणि नकारात्मक ऊर्जेला आत प्रवेशच देत नाहीत, असं मानलं जातं. 

अधिक वाचा - Shani margi 2022: 23 ऑक्टोबरला शनी होणार मार्गस्थ, या राशीच्या लोकांची साडेसाती होणार दूर

तिजोरीत ठेवा मुळं

अशोकाच्या झाडाची मुळं कधीही संपत्तीची वानवा भासू देत नसल्याचं सांगितलं जातं. तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता, तिथं अशोकाच्या झाडाची मूळं ठेवली, तर संपत्तीची भरभराट होत असल्याचं मानण्यात येतं. 

अशोकाच्या झाडाला पाणी

अशोकाच्या झाडाला पाणी घातल्यामुळे निसर्गदेवता नेहमीच प्रसन्न राहते, असं सांगितलं जातं. ज्या घराच्या अंगणात अशोकाचं झाड असतं, तिथं उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदते, असं मानलं जातं.

डिस्क्लेमर - सामान्य भावना आणि इंटरनेटवरील माहितीच्या आधारे या टिप्स देण्यात आल्या आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी