Astrology : शनिदेवाच्या प्रभावामुळे या दोन राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाची असते भरभराट; पैसे कमवण्यात असतात सर्वात पुढे

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jan 07, 2022 | 12:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shani Zodiac Sign | वैदिक ज्योतिषामध्ये शनिदेवाला न्याय आणि कृतीची देवता मानले जाते. शनिदेव मनुष्याप्रमाणेच फळ देतात. शनि माणसाच्या कर्माशी संबंधित आहे आणि त्याचे परिणाम मानवी जीवनात आहेत. शनिदेवाच्या कृपेशिवाय कोणत्याही व्यक्तीला जीवन कसे जगायचे हे कळू शकत नाही. शनिच्या कृपेशिवाय लग्न किंवा अपत्ये देखील होत नाही.

Capricorn and Aquarius people have a lot of money due to the influence of Saturn
शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांमध्ये पैशाची असते भरभराट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वैदिक ज्योतिषामध्ये शनिदेवाला न्याय आणि कृतीची देवता मानले जाते.
  • मकर राशीचे लोक खूप व्यवहारी असतात, ज्यामुळे इतर लोक त्याच्यांकडे लवकर आकर्षित होतात.
  • कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत, जे त्या राशीतील लोकांना मेहनती बनवतात.

Saturn Zodiac Sign People Personality | नवी दिल्ली : वैदिक ज्योतिषामध्ये शनिदेवाला (Saturn) न्याय आणि कृतीची देवता मानले जाते. शनिदेव मनुष्याप्रमाणेच फळ देतात. शनि माणसाच्या कर्माशी संबंधित आहे आणि त्याचे परिणाम मानवी जीवनात आहेत. शनिदेवाच्या कृपेशिवाय कोणत्याही व्यक्तीला जीवन कसे जगायचे हे कळू शकत नाही. शनिच्या कृपेशिवाय लग्न किंवा अपत्ये देखील होत नाही. शनि व्यक्तीला आध्यात्मिक आणि भौतिक लाभ देखील मोठ्या प्रमाणात देतात. शनिदेव प्रसन्न झाले तर वाईट कामे पूर्ण होतात, जीवनात भरपूर यश मिळते. मात्र शनिदेव नाराज असल्यास केलेले कार्य एकतर बिघडते किंवा थांबते. त्यामुळे या दोन राशींवर शनिदेवाची कृपा राहते. (Capricorn and Aquarius people have a lot of money due to the influence of Saturn). 

Gemology : पोवळे रत्न घातल्याने या लोकांचे नशीब चमकू शकते, जाणून घ्या ते वापरण्याची योग्य पद्धत

मकर राशी (Makar Rashi)    

मकर राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर या राशीचे लोक खूप व्यवहारी असतात. त्यामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील व्यक्तींनी ठरवलेले काम पूर्ण करूनच त्यांना आराम मिळतो. त्याच्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचे आकर्षण असते, ज्यामुळे इतर लोक त्याच्यांकडे लवकर आकर्षित होतात. त्यामुळे इतर लोकांनी केलेल्या कामाचे मकर राशीतील लोक खूप कौतुक करतात. ज्या क्षेत्रात ही लोकं प्रामाणिक मनाने काम करतात त्या क्षेत्रात त्यांना चांगले यश मिळते. त्यांच्या आयुष्यात सुख-सुविधांची कधीच कमतरता नसते. मकर राशीवर शनिदेवाचे राज्य आहे. त्यामुळे शनिदेव त्यांना मेहनत आणि परिश्रमाचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ देतात. 

या नावाच्या मुलींमध्ये असतात लीडरशिपचे गुण, कामाच्या ठिकाणी लवकर बनतात बॉस

कुंभ राशी (Kumbh Rashi) 

कुंभ राशीचे लोक खूप सामाजिक, आनंदी स्वभावाचे आणि आकर्षित व्यक्तिमत्त्वाचे असतात. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव आहेत. जे त्यांना मेहनती बनवतात. या राशीतील लोक कर्मावर विश्वास ठेवतात. तसेच हे लोक कोणतेही काम हातात घेतले की ते पूर्ण करून सोडून देतात. ते आपल्या वागण्याने सर्वांची मने जिंकण्यास देखील तत्पर असतात. लक्षणीय बाब म्हणजे कुंभ राशीतील लोकांना महागड्या वस्तूंची आवड आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ते लगेच हार मानत नाहीत. मोठ्या आव्हानांना तोंड देत ते यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. पैशाच्या बाबतीत ते खूप भाग्यवान मानले जातात.

Dream Interpretation: स्वप्नात या गोष्टी पाहणे शुभ मानले जाते, भरपूर पैसा मिळण्याचे आहेत संकेत

ज्योतिषात शनि ग्रह:

दरम्यान, तूळ राशीमध्ये शनि उच्च स्थानी असतो तर मेष राशी त्याच्या शेवटच्या स्थानावर असल्याचे बोलले जाते. २७ नक्षत्रांपैकी त्याच्यांकडे पुष्य, अनुराधा, पूर्वभाद्रपद नक्षत्रांचा हक्क आहे. बुध आणि शुक्र हे शनिचे मित्र ग्रह मानले जातात तर सूर्य, चंद्र आणि मंगळ हे शत्रू ग्रह मानले जातात. शनीच्या संक्रमणाचा कालावधीचा सुमारे ३० महिने एवढा आहे. तसेच शनिची आपल्या कुंडलीत त्या विशिष्ठ कालावधीसाठी कार्यरत असण्याचा काळ म्हणजेच महादशा १९ वर्षांची आहे. जर कुंडलीमध्ये शनि मजबूत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही आरोग्याची चिंता नसते. सोबतच त्याची सर्व कामे मार्गी लागत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी