Chanakya Niti For Life: 'या' लोकांशी कधीही पत्करु नका शत्रूत्व, पराभवासोबत आयुष्यही येईल धोक्यात

Chanakya Neeti: चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने कधीही भांडण-तंटा करू नये. अगदीच नाईलाज असेल तर आधी समोरच्या व्यक्तीबद्दल नीट जाणून घ्या, कारण काही लोकांशी भांडून कधीच विजय मिळत नाही.

chanakya niti for life never enmity with such people life will also be in trouble with defeat
Chanakya Niti For Life: 'या' लोकांशी कधीही पत्करु नका शत्रूत्व, पराभवासोबत आयुष्यही येईल धोक्यात 
थोडं पण कामाचं
  • हातात शस्त्र असलेल्या व्यक्तीशी लढणे जीवावर बेतू शकतं
  • जर तुम्ही सत्ताधीस व्यक्तीसोबत लढलात तर तो तुमचा नाश करेल
  • मूर्ख आणि श्रीमंत व्यक्तीशी भांडलात तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.

Chanakya Neeti: आचार्य चाणक्य मानतात की शांत आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लोकांनी कधीही वादात पडू नये. तथापि, अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत किंवा बळजबरीने लोकांसोबत वाद होतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, इतरांशी भांडणे हा जीवनाचा एक क्रम आहे. लोकांना कधी ना कधी इतरांशी वाद करावा लागतो. तथापि, एखाद्या व्यक्तीशी वाद घालण्याआधी समोरच्या व्यक्तीबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. चाणक्य नीती सांगते की, व्यक्तीने आयुष्यात कधीही 4 प्रकारच्या लोकांशी भांडण किंवा शत्रुत्व करू नये. कारण या लोकांविरोधत कधीच विजय मिळत नाही. त्यांच्यासोबत लढणं हे आपल्यासाठीच नुकसान करणारं ठरु शकतं.

शस्त्र बाळगणारी लोकं

आचार्य चाणक्य म्हणतात

की, ज्या व्यक्तीच्या हातात शस्त्र आहे त्यापासून दूर राहणे चांगले. अशा लोकांशी कधीही भांडण करू नका. ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत त्यांच्याशी तुम्ही भांडत असाल तर ते रागाच्या भरात त्याच शस्त्राने तुमच्यावर हल्ला करू शकतात. असा संघर्ष जीवघेणा असतो.

अधिक वाचा: Bad Habit: दारिद्रयाच्या रस्त्यावर नेतात व्यक्तीच्या या ४ वाईट सवयी, लगेचच द्या सोडून नाहीतर...

तुमचं गुपित माहित असणारा 

आचार्य चाणक्य मानतात की, एखाद्याचे सर्वात मोठे नुकसान त्याचं गुपित माहित असणारा व्यक्तीच करू शकतो. म्हणूनच माणसाने अशा लोकांशी कधीही संबंध ठेवू नये. आचार्य म्हणतात की विभीषणाला रावणाची रहस्ये माहित होती आणि त्याने ती रहस्ये रामाला सांगितली होती. त्यामुळे रावण युद्धात मारला गेला. म्हणून अशा लोकांशी कधीही वाद घालू नका.

अधिक वाचा: तिजोरीत या धातूची वीट ठेवल्यानं उघडेल नशिबाचे दार, जाणून घ्या का ठेवली जाते वीट

मूर्ख माणूस

आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख व्यक्तीशी कधीही भांडण करू नये. शास्त्रात अशा लोकांपासून मैत्री आणि शत्रूत्व करु नये अशा  सूचना देण्यात आल्या आहेत. आचार्य म्हणतात की, ज्या व्यक्तीला स्वतःचे हित किंवा हानी समजू शकत नाही, त्याला तुमच्याबद्दल काय समजेल, म्हणून त्यांच्याशी वादच घालू नका.

श्रीमंत माणूस

चाणक्य नीतीनुसार श्रीमंत आणि शक्तिशाली व्यक्तीसोबत कधीही भांडण करू नये. कारण तो त्यांच्या पैशाने आणि शक्तीने तुमचा पराभव करू शकतो. अशा लोकांसोबत तुम्ही जिंकू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याशी भांडण न केलेलेच बरे.

(टीप: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि साहित्यावर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी