Chanakya Niti read in marathi: आचार्य चाणक्य यांनी समाजाबाबत, नागरिकांबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच मुले आणि पालक यांचे नाते-संबंध याबाबतही चाणक्य नितीत खूप काही सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, काही पालक अनेक चुका करतात आणि ते मुले, पालकांसाठी त्रासदायक असतात. पालकांनी आपल्या चुका वेळीच सुधारल्या तर ते मुलाचे भविष्य घडवू शकतात. इतकेच नाही तर त्यांच्या संपत्तीतही वाढ होते आणि आयुष्य सुखमय होते. आपल्या मुलाचे भवितव्य घडवायचे असेल तर पालकांनी या तीन चुका करू नयेत.
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे पालक आपल्या पाल्याला चांगले संस्कार देत नाहीत, मुलाला सुसंस्कृत बनवत नाहीत असे पालक आपल्या मुलाचे शत्रू आहेत. या सर्वांमुळे मुलाचे भवितव्य बिघडते आणि त्यासोबतच पालकांचेही भविष्य अंधारात जाते. मुलं चुकीच्या मार्गाने चालू लागतात.
हे पण वाचा : ही ओषधी वनस्पती केसांना लावा अन् जादू पाहा
मुलांना योग्य शिक्षण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. मुलाला चांगले शिक्षण देण्यापासून थांबू नये. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास ते उच्च शिक्षणापासून वंचित राहू शकतात. जे पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत नाहीत ते स्वत:च्या मुलाचे शत्रू आहेत. उच्च शिक्षणाच्या अभावामुळे मुलांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी पालकांनाही भविष्यात अडचणी येतात.
हे पण वाचा : असंख्य गुण असलेली शतावरी पुरुषांना देते जबरदस्त स्टॅमिना अन् पावर
आचार्य चाणक्य सांगतात की, मुलांचे जास्त लाड करु नये. यामुळे मुले बिघडतात. तसेच नंतर मुलं हट्टी होतात आणि नंतर परिणामी त्यांना हवे तसेच ते करू लागतात. हा हट्टीपणा मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी चांगला नाही. यामुळे मुले बिघडतात.
हे पण वाचा : कलिंगडच्या बिया वाढवतात शुक्राणूंची संख्या, तुम्ही ट्राय केलं का?
मुलांनी आई-वडिलांचे ऐकणे आवश्यक आहे. तर पालकांनी मुलांचे संगोपन करणे आवश्यक आहे. मुलांच्या संगोपणात कमतरता असेल तर मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यामुळे असे पालक हे मुलांचे शत्रू बनतात.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. आमचा उद्देश केवळ माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे असा आहे. ही माहिती केवळ माहिती म्हणूनच घ्यावी.)