चंद्रग्रहणाच्या काळात गरोदर महिलांनी घ्या 'ही' काळजी

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 16, 2019 | 20:19 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Chandra Grahan 2019: १६ जुलै रोजी म्हणजेच आज रात्री या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण काळात गरोदर महिलांनी इतरांच्या तुलनेत अधिक काळजी गरजेचं मानलं जातं.

Pregnant woman precautions Chandra Grahan 2019
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • तीन तास सुरू राहणार ग्रहण
  • ग्रहण काळात गरोदर महिलांनी घ्यावी काळजी
  • या काळात गरोदर महिलांनी काही गोष्टी पाळाणं आवश्यक

Chandra Grahan Pregnant Woman precautions: १६ जुलै रोजी यंदाच्या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण होत आहे. हे चंद्रग्रहण भारतातून पाहता येणार आहे. हे ग्रहण जवळपास तीन तास सुरू राहणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून १६ जुलैच्या रात्री १ वाजून ३२ मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत ग्रहण सुरू राहणार आहे. चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो या दोन्ही खगोलीय घटना आहेत ज्या प्रत्येकवर्षी घडत असतात.

ग्रहण नुसत्या डोळ्यांनी (चष्मा न लावता) पाहणं धोकादायक मानलं जातं. हे खरं सुद्धा आहे मात्र, केवळ सूर्यग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहू नये. सूर्यग्रहण नुसत्या डोळ्यांनी पाहिल्यास त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. चंद्रग्रहण तुम्ही चष्मा न लावता सुद्धा पाहू शकतात. हिंदू धर्मात चंद्रग्रहणाच्या संदर्भात अनेक पौराणिक मान्यता आहेत. खासकरुन गर्भवती महिलांनी ग्रहण काळात काळजी घ्यावी असे सल्ले सुद्धा दिले जातात. चंद्रग्रहण हे गर्भवती महिलांना इतरांच्या तुलनेत अधिक नुकसानदायक असल्याचं मानलं जातं. त्यामुळे ग्रहण काळात गरोदर महिलांनी काही नियमांचं पालन करण्याचे सल्ले सुद्धा दिले जातात. गरोदर महिलेच्या गर्भात असणाऱ्या बाळावर ग्रहणाचा परिणाम होण्याचा धोका असतो असं मानलं जातं. त्यामुळे गर्भवती महिलांना ग्रहण काळात विशेष काळजी घेण्याचे सल्ले दिले जातात.

गरोदर महिलांनी चंद्रग्रहणापासून का रहावे दूर

चंद्रग्रहणाच्या काळात चंद्र पृथ्वीच्या खूपच जवळ येतो आणि त्यासोबतच गुरुत्वाकर्षणही अधिक असतं. त्यामुळे गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणात चंद्राकडे न पाहण्याचा सल्ला दिला जातो. चंद्रग्रहणाच्या काळात गरोदर महिलांच्या शरीरातील हार्मोनल चेंज होऊ शकतात. यामुळे घाम येणं, घाबरणे, इमोशनल होणं अशा प्रकारच्या घटना होतात. चंद्रग्रहणाचा महिलांच्या ब्लड प्लेशरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

होणाऱ्या बाळावर होऊ शकतो परिणाम

चंद्रग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी घराच्या बाहेर पडू नये असा सल्ला नेहमीच दिला जातो. तसेच गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळात चंद्राकडे पाहिल्यास त्याचा थेट परिणाम हा बाळावर होतो. त्यामुळे होणारं बाळ हे शारीरिक आणि मानसिक रूपाने कमकुवत होतो असं मानलं जातं.

धारदार वस्तुंचा वापर टाळा

ग्रहण काळात गरोदर महिलांनी धारदार किंवा टोकदार वस्तुंचा वापर करणं टाळावं. कैची, सूई आणि चाकू यांसारख्या धारदार, टोकदार वस्तू गरोदर महिलांनी ग्रहण काळात वापरु नयेत. या वस्तुंच्या वापरल्याने होणाऱ्या बाळावर परिणाम होतो असंही मानलं जातं. 

ग्रहण काळात काय खाऊ नये?

चंद्रग्रहण सुरू असताना नॉन वेज (मांसाहारी) खाद्य खाऊ नये, तसेच हाय प्रोटीन फूड खाणं टाळा. ग्रहण काळात हे खाल्ल्यास पचन प्रक्रिया चांगली होत नसल्याचं बोललं जातं.

(टीप: आम्ही या गोष्टींचं समर्थन करत नाही. मात्र, ग्रहण काळात काही गोष्टी न करणं हे चांगलं असल्याची अनेकांची मान्यता आहे आणि आम्ही त्याचं केवळ वृत्तांकन करत आहोत.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
चंद्रग्रहणाच्या काळात गरोदर महिलांनी घ्या 'ही' काळजी Description: Chandra Grahan 2019: १६ जुलै रोजी म्हणजेच आज रात्री या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण काळात गरोदर महिलांनी इतरांच्या तुलनेत अधिक काळजी गरजेचं मानलं जातं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...