Chandra Grahan 2022 Date: लवकरच चंद्रग्रहण, लक्षात ठेवा तारीख आणि वेळ

Chandra Grahan 2022 in India Date and Time, Lunar Eclipse October 2022 Date, Timings in India:वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण काही दिवसात होणार आहे. हे संपूर्ण चंद्रग्रहण असेल.

chandra grahan 2022 date last lunar eclipse of the year soon note down date and time
लवकरच चंद्रग्रहण, लक्षात ठेवा तारीख आणि वेळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जाणून घ्या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण नेमकं कोणत्या तारखेला
  • चंद्रग्रहणाचे वेध कधी लागणार?
  • खग्रास चंद्रग्रहण भारतातील अनेक भागातून दिसणार

Chandra Grahan 2022 Date and Time in India: या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे जे भारताच्या काही भागातून दिसणार आहे. धार्मिकदृष्ट्या चंद्रग्रहण हे अशुभ मानले जाते. कारण हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सुतक काळही पाळला जाईल. ग्रहण काळात अनेक महत्त्वाची कामं ही शक्यतो टाळली जातात. कारण हा काळ अत्यंत अशुभ मानला जातो. जाणून घ्या 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या चंद्र ग्रहणाची संपूर्ण माहिती. (chandra grahan 2022 date last lunar eclipse of the year soon note down date and time)

चंद्रग्रहण 2022 तारीख आणि वेळ (Chandra Grahan 2022 Date And Time):

यंदाचं शेवटचं चंद्रग्रहण हे 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. जे संध्याकाळी 5:32 वाजता सुरू होईल आणि 6 वाजून 18 मिनिटांनी संपेल. याचा सुतक कालावधी हा सकाळी 9.21 वाजेपासून सुरू होईल आणि याचा कालावधी जेव्हा ग्रहण संपेल तेव्हाच समाप्त होईल.

अधिक वाचा: Surya Grahan 2022 Date: या वर्षी पुढील सूर्यग्रहण कधी होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे ग्रहण कुठे दिसणार? 

हे चंद्रग्रहण प्रामुख्याने ईशान्य युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, हिंद महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. तसेच भारताच्या काही भागातही हे चंद्रग्रहण दिसणार आहे.

भारतात कुठे दिसेल चंद्रग्रहण 

खग्रास चंद्रग्रहण हे भारतात फक्त पूर्वेकडील भागांतून दिसेल तर आंशिक ग्रहण देशाच्या इतर भागांतून दिसेल. कोलकाता, सिलीगुडी, पटना, रांची, गुवाहाटी ही काही शहरे आहेत जिथे खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा: नोव्हेंबर 2022 मध्ये चमकणार 4 राशींचे नशीब

चंद्रग्रहण काळात काय करू नये? 

धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहण असणे हे शुभ मानले जात नाही. त्यामुळे या काळात शुभ कार्य करू नये. ग्रहण काळात अनेक ठिकाणी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तसेच अन्नपदार्थांमध्येही तुळशीची पाने टाकली जातात. याशिवाय ग्रहण काळात देवाची मनोभावे पूजा देखील केली जाते. दुसरीकडे असाही एक समज आहे की, गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी