Chandra Grahan 2023: वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणामुळे 'या' राशींचं नशीब फळफळणार, जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी

Chandra Grahan affect to zodiac sign: ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहणाला खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. इतकंच नाही तर चंद्रग्रहणाचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम होऊ शकतात असंही मानलं जातं. जाणून घ्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कधी होणार आहे आणि त्याचा कोणत्या राशींवर काय परिणाम होणार...

Chandra Grahan 2023 lunar eclipse these zodiac sign people will get wealth and prosperity read in marathi
Chandra Grahan 2023: वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणामुळे 'या' राशींचं नशीब फळफळणार, जाणून घ्या कोणत्या आहेत या राशी 
थोडं पण कामाचं
  • वर्षातील पहिलं चंद्रग्रहण कधी?
  • कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार लाभ

Chandra Grahan 2023 : ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या महत्त्वपूर्ण खगोलीय घटना मानल्या जातात. कारण, याचा प्रभाव मनुष्य, राजकीय क्षेत्र, देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांवर सुद्धा पडतो. 2023 मधील पहिलं चंद्रग्रहण शुक्रवार, 5 मे 2023 रोजी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 6 मे 2023 रोजी चंद्रग्रहण संपणार आहे.

2023 मधील पहिलं चद्रग्रहण हे छायाकल्प चंद्रग्रहण असणार आहे. या चंद्रग्रहणामुळे भारतात सूतक काळ पाळण्यात येणार नाही. मात्र, या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक रुपाने पडेल. ज्योतिष विद्वानांनुसार, तीन राशी अशा आहेत ज्यांच्यावर चंद्रग्रहणाचा सकारात्मक परिणाम होणार आहे. तसेच चंद्रग्रहणामुळे धनलाभ आणि प्रगती होऊ शकते.

हे पण वाचा : चेरी टोमॅटो, टेस्टच नाही आरोग्यासाठीही आहे एकदम बेस्ट

मेष / Aries

या चंद्रग्रहणाचा मेष राशीच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात व्यवसायात प्रगती होईळ. तसेच कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : अरेंज मॅरेज करण्यापूर्वी हे 7 प्रश्न नक्की विचारा

सिंह / Leo

5 मे रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव सिंह राशीवर दिसू शकतो. हा काळ नवीन कार्य सुरू करण्यासाठी उत्तम असणार आहे. तसेच या काळात कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. धार्मिक कार्यात रुची वाढेल. संबंधित कामात पैसा खर्च होऊ शकतो.

हे पण वाचा : काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय

मकर / Capricorn

मकर राशीच्या व्यक्तींसाठी 2023 चे चंद्रग्रहण हे शुभ मानले जाते. या दरम्यान पदोन्नती होण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडू शकतात. मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदीची योजना आखण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्राशी संबंधीत लोकांनाही या काळात लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. आमचा उद्देश केवळ माहिती पुरवणे इतकाच आहे.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी