Chandra Grahan 2022: चंद्र ग्रहणावेळी करु नये काम, परंतु या चार जणांना आहे सूट

Lunar Eclipse 2022 या वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण सोमवारी १६ मे २०२२ रोजी लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यासाठी भारतात सुतक काल लागू होणार नाही. कालनिर्णयमध्येही चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने नियम आणि विधी पाळू नये असे म्हटले आहे. धार्मिक शास्त्रांत चंद्र ग्रहण हे अशुभ मानले आहे.

Lunar Eclipse
खग्रास चंद्रग्रहण २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण सोमवारी १६ मे २०२२ रोजी लागणार आहे.
  • हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही.
  • धार्मिक शास्त्रांत चंद्र ग्रहण हे अशुभ मानले आहे.

Chandra Grahan (Lunar Eclipse) May 2022: चंद्र ग्रहणावेळी अनेक नियमांचे पालन करावे लागते. ग्रहणावेळी नकारात्मक उर्जेचा जास्त प्रभाव असतो. यामुळे व्यक्तीवर प्रभाव पडतो. 

Chandra Grahan May 2022:  या वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण सोमवारी १६ मे २०२२ रोजी लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यासाठी भारतात सुतक काल लागू होणार नाही. कालनिर्णयमध्येही चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने नियम आणि विधी पाळू नये असे म्हटले आहे. धार्मिक शास्त्रांत चंद्र ग्रहण हे अशुभ मानले आहे. यासाठी ग्रहणावेळी पुजा,अर्चना करणे, प्रवास आणि खाण्यासारख्या अनेक गोष्टींवर निर्बंध असतात.  या नियमांचे सगळ्यांना पालन करावे लागे. परंतु काही जणांना या नियमांत सूट असते. ग्रहणावेळी हे लोक खाणे पिणे सुरू ठेवू शकतात, कोण आहेत हे लोक जाणून घेऊया. 


या चार लोकांना मिळते ग्रहणात सूट (Chandra Grahan 2022 India)

गरोदर महिला : ग्रहणावेळी (Chandra Grahan 2022)  अनेकवेळेला गरोदर महिलांना अनेक निर्बंद असतात. परंतु ग्रहण जास्त काळ असेल तर गरोदर महिलांनी वेळोवेळी योग्य आहार घ्यावा. सध्या उन्हाळा सुरू आहे. या ऋतुत गरोदर महिलांनी खाण्या पिण्यापासून वंचित राहू नये. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यासाठी थोड्या थोड्या वेळांनी पाणी किंवा फळांचा रस घेणे गरजेचे आहे. ग्रहणाचावेळी जास्त खाणेही चुकीचे आहे. 

लहान मुले : चंद्र ग्रहणावेळी खाणे आणि पिण्यास मनाई असते. परंतु अशा वेळी लहान मुले फार वेळ उपाशी राहू शकत नाही. लहान मुले खेळत असतात आणि त्यामुळे ते थकतात आणि त्यांना भूक लागते. अशावेळी पालकांनी मुलांना थोड्या थोड्या वेळाने खायला देणे गरजेचे आहे. तसेच दुध पिणार्‍या नवजात बाळांना उपाशी ठेवू नये तसेच त्यांनी झोप पूर्ण होईल याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. 


वृद्ध व्यक्ती : जर घरात कोणी वृद्ध व्यक्ती असेल तर त्यांना उपाशी ठेवू नका. ग्रहणाचा मोठा काळ असेल तर त्यांना वेळेवर जेवण द्या. कारण जसे जसे वय वाढत जाते तस तसे त्यांची शारिरीक क्षमता कमी होत जाते. अशा वेळी वृद्धांना वेळोवेळी जेवण देणे गरजेचे आहे. 

आजारी व्यक्ती : ग्रहणावेळी आजारी व्यक्ती मग ती कुठल्याही वयाचा असो त्यांनी वेळेवर खाणे गरजेचे आहे. ग्रहण असतानाही रुग्णाने वेळीच जेवले पाहिजे आणि वेळेवर औषध घेतले पाहिजे. 


ग्रहणावेळी या नियमांचे करा पालन

काही नियम असतात जे सगळ्यांनी पाळलेच पाहिजे, त्यामुळे चंद्रग्रहाणाचे दुष्परिणाम होत नाहीत. ग्रहणावेळी खाण्या पिण्याच्या पदार्थांवर तुळशीचे पान ठेवा. ग्रहणावेळी कुठलाही प्रवास करू नका. ग्रहणावेळी पुजा, अर्चना करण्यासही मनाई आहे.

(डिस्क्लेमर : ही माहिती इंटरनेटवर आधारित साहित्यावर लिहिला आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी