Mantra for life: दररोज 'या' 5 मंत्रांचा करा जप, आयुष्य होईल सुखकर

Mantra Jaap for sucess: आयुष्यात सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी वेळेवर झोपणे, खाणे-पिणे आवश्यक आहे. त्यासोबतच काही मंत्र सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 

Mantra for life: प्रत्येक व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात चांगली करु इच्छितो. शास्त्रानुसार, जर सकाळची सुरुवात सकारात्मक झाली तर तुमचा संपूर्ण दिवस हा चांगला जाईल. आयुष्यात सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यासाठी वेळेवर सकाळी उठणे, रात्री वेळेवर झोपणे, वेळेवर जेवण करणं खूप महत्त्वाचे आहे. यासोबतच काही मंत्र सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. आज आम्ही तुम्हाला असे पाच मंत्र सांगणार आहोत ज्याचा जप केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येईल. जाणून घ्या कोणते आहेत हे मंत्र? (chant this 5 mantra every day you will get success read in marathi)

पहिला मंत्र

ज्योतिष शास्त्रानुसार, सकाळी उठल्यावर आपले दोन्ही हात समोर ठेवून त्यात पाहा आणि मग मंत्राचा जप करा. असे मानले जाते की, या मंत्राच्या जपामुळे घरात सुख-समृद्धी येते. 

कराग्रे वसते लक्ष्मी: कर्मधे सरस्वती |
करमुले तू गोवंदा: प्रभाते करदर्शनम || 

हे पण वाचा : कोणत्या राशीची व्यक्ती कशी फ्लर्ट करते? तुमची रास कोणती?

दुसरा मंत्र

अंघोळ करताना या मंत्राचा जप करा. या मंत्राने आपण पवित्र नद्यांचे स्मरण करतो. 

गंगेच यमुना चैवा गोदावरी सरस्वती | 
नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन्संनिधीम् कुरु ||

तिसरा मंत्र

दररोज सकाळी सूर्य देवताला जल अर्पण करावे. त्यावेळी ऊँ सूर्याय नम: या मंत्राचा जप करावा.

हे पण वाचा : ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? वाचा सर्व शंकांची उत्तरे एका क्लिकवर​

चौथा मंत्र

आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगतात की, जेवणाचा सन्मान करावा. असं म्हणतात की, जेवणाचा अनादर केल्यास देवता नाराज होतात. त्यामुळे जेवण करण्यापूर्वी खालील मंत्राचा जप करावा. 

ऊँ सह नावतू | नऊ भुंकटु सह || 
तेजस्विनावधिमस्तू हे माझे ज्ञान | ओम शांति ||

पाचवा मंत्र

रात्री झोपण्यापूर्वी शयन मंत्राचा जाप करण्याचा सल्ला दिला जातो. या मंत्रामुळे भगवान विष्णू आपली रक्षा करतात. 

जले रक्षतु वराह: स्थले रक्षतु वामन: | 
अतव्य नरसिंहश्च सर्वता पातु केशव ||

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी