Daily Horoscope : राशीभविष्य १६ नोव्हेंबर २०२१: जाणून घ्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या मंगळवारचे भविष्य

Daily Horoscope राशी भविष्य, १६ नोव्हेंबर २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

daily rashi bhavishaya 16 november 2021 daily horoscope
Daily Horoscope : राशीभविष्य १६ नोव्हेंबर २०२१ 
थोडं पण कामाचं
 • मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: प्रेमात असाल तर जोडीदाराला लग्नाचा मागणी घालण्यास योग्य वेळ.
 • कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: धनलाभ होण्याची शक्यता आहे.
 • कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यापारात मोठे यश मिळेल.

आजचे राशी भविष्य १६ नोव्हेंबर २०२१ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? (daily rashi bhavishaya 16 november 2021 daily horoscope )

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: प्रेमात असाल तर जोडीदाराला लग्नाचा मागणी घालण्यास योग्य वेळ. भगवान विष्णूचं नामस्मरण करा. तुमचं आरोग्य चांगली राहील. शुभ रंग : पांढरा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: बँकिंग आणि आयटी फील्डमधील व्यक्ती आपलं टार्गेट पूर्ण करतील. विद्यार्थी यशस्वी होतील. शुभ रंग : निळा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: मुलांना यश प्राप्त होईल. आयटी आणि चित्रपट क्षेत्रात विद्यार्थी असलेल्यांची प्रगती होईल. विद्यार्थ्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुमची लव लाइफ चांगली असेल. आरोग्यात अडचणी येऊ शकतात. शुभ रंग - हिरवा.  
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच प्रसार माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना यश मिळेल. तसंच दिवशी तुम्ही नवीन व्यवसायाची योजना करू शकता. प्रेम प्रकरणात काही समस्यांचा सामना करावा लागणार आहे. शुभ रंग पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: राजकारणात यश प्राप्त होईल. व्यापारात नवं कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक गुरूंचे आशीर्वाद लाभले जातील. व्यवसायात प्रगती कराल. प्रेम जीवनात आनंदी व्हाल. शुभ रंग - हिरवा.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: प्रथम तुम्ही एक कार्य व्यवस्थित पूर्ण करा आणि त्यानंतर दुसरं काम करण्यास सुरूवात करा. संपत्तीचे आगमन आपल्याला आनंदी ठेवेल. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग - पांढरा. 
 7. तूळ राश‍ी भविष्य /  Libra Horoscope Today: आर्थिक दिशेनं सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. मुलाच्या बाजूकडून एखादी चांगली बातमी प्राप्त होईल. मोठा धनलाभ होईल. शुभ रंग - निळा. 
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: नव्या व्यवसायासंबंधीची योजना मार्गी लागेल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना बरंच यश मिळेल. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. प्रेमी युगुलांना देखील काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शुभ रंग - पांढरा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धार्मिक कार्यात तुम्हाला स्वारस्य निर्माण होईल. नोकरीमध्ये यश संपादन कराल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. विष्णूसहस्त्रनामाचं पठण करा. शुभ रंग - नारंगी.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: जोडीदाराची चांगली साथ मिळेल, पोटाचे विकार उद्भवू शकतात त्यामुळे थोडी काळजी घ्या. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. शुभ रंग - पिवळा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: व्यापारात मोठे यश मिळेल. व्याज, कमिशनमधून भरपूर पैसा येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यश मिळेल. आपले आरोग्य जपा. आरोग्याबाबत कोणतीही हलगर्जीपणा करू नका. शुभ रंग - लाल. 
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबात सौख्य राहील. आनंदाने परिपूर्ण असा दिवस आहे. मित्रांशी कोणताही वाद घालू नका नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते. शुभ रंग - पांढरा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी