Darsh Amavasya : हिंदू पंचांगानुसार आज दर्श अमावस्या आहे. हिंदू शास्त्रानुसार आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी व्रत केल्यास आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळातात तसेच पुण्यही मिळते. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान करायचे असते, परंतु प्रत्येक भाविकाला हे शक्य नाही म्हणून अशा वेळी गंगाजल प्राशन करावे आणि घरात शिंपडावे. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक उर्जा नाहीशी होते. ज्यांच्या कुंडलीत चंद्रमा कमकुमवत असतो त्यांच्या कामात अडथळे येतात, ताण येतो आणि मानसिक आरोग्य बिघडतं. अशा भाविकांनी आवर्जून चंद्राची पुजा करावी. चंद्रदेवाची पुजा केल्यास हे दोष दूर होतात. दर्श अमावस्येला श्राद्ध अमावस्याही म्हणातात. या दिवशी आपले पितरं स्वर्गातून पृथ्वीवर येतात. या दिवशी त्यांच्यासाठी पुजा केल्यास पुण्य मिळतं. अनेक कामे मार्गी लागतात.
ज्योतिष शास्त्रानुसार ३१ मार्च गुरूवारी दुपारी १२.२२ मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होईल. यासाठी ३१ मार्चरोजी पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध आणि पुजा करावी. अमावस्येशी निगडीत पुजाही याच वेळी करावी
चैत्र अमावस्या तिथि प्रारंभ: ३१मार्च, गुरुवार, दुपारी १२.२२ वाजता
चैत्र अमावस्या तिथि समाप्त: १ एप्रिल, शुक्रवार सकाळी ११.५४ वाजता
दोनही दिवशी अमावस्येची तिथी असेल.