Datta Jayanti 2022 Messages in Marathi: दत्त जयंती निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, WhatsApp, Facebook वर शेअर करुन दिवस करा मंगलमय!

दत्त जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया माध्यमातून शेअर करा मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Wishes, Images आणि शुभेच्छापत्रं...

datta jayanti 2022 messages in marathi wishes images to shared via whatsapp facebook to celebrate auspicious day
दत्त जयंती निमित्त मराठी शुभेच्छा संदेश 
थोडं पण कामाचं
  • मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ही दत्तजयंती म्हणून साजरी करतात.
  • यंदा बुधवार, 7 डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे.
  • श्रीदत्तांना विष्णूचा सहावा अवतार मानला जातो.

Datta Jayanti 2022 Messages: मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ही दत्तजयंती म्हणून साजरी करतात. यंदा बुधवार, 7 डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे. श्रीदत्तांना विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. दत्तजयंती निमित्त गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर आदी दत्ताची स्थाने असलेल्या ठिकाणी मोठा उत्सव असतो. तसंच लहान मोठी दत्तमंदिरात या दिवशी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, धार्मिक कार्यक्रम यांची रेलचेल असते. पालखी सोहळा साजरा केला जातो. (datta jayanti 2022 messages in marathi wishes images to shared via whatsapp facebook to celebrate auspicious day)

अधिक वाचा : Dutta Jayanti : दत्त देवाची कशी साजरी कराल जयंती आणि आरती

डिजिटल युगात तुम्ही सोशल मीडिया माध्यमातून शुभेचछा संदेश पाठवून दत्त जयंती साजरी करु शकता. फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडिया माध्यमातून मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages,Images आणि शुभेच्छापत्रं शेअर करुन तुम्ही दत्त जयंतीचा उत्साह कायम ठेवू शकता.

अधिक वाचा : श्री दत्त देवाला आहेत 108 नावे; काय आहेत या नावांचे अर्थ

दत्त जन्माच्या वेगवेगळ्या कथा सांगतिल्या जातात. तसंच दत्त नाव कसे पडले याचीही अख्यायिका आहे. ऋषी अत्री आणि पत्नी अनुसया यांच्या घरी आलेले तीन पाहुणे खुद्द ब्रम्हा, विष्णू, महेश होते, हे अत्री ऋषींनी ओळखले. आणि त्यांची नावे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी ठेवली. त्यातला दत्त हा विष्णूचा अवतार होता. पुढे चंद्र चंद्रलोकी निघून गेला. दुर्वास तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला आणि दत्त या तिघांचे रुप म्हणून राहिला. त्याला तीन शिरे आणि सहा हात असल्याने दत्तात्रेय असे नाव पडले. तर देवाच्या कृपेने झाला म्हणून दत्त आणि अत्रि ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय. त्यामुळे दत्त आणि अत्रेय मिळून दत्तात्रेय नाव पडेल अशी दुसरी कथा सांगितली जाते.

अधिक वाचा : या पाच मराठी महिन्यात बांधा तुमचं घर, नाहीतर होईल नुकसान

दत्त जयंतीचे शुभेच्छा संदेश 

dutta jayanti

Datta Jayanti 2022 Messages in Marathi । Photo File

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, 

हरपले मन झाले उन्मन 

मी तूपणाची झाली बोळवण, 

एका जनादर्नी श्रीदत्त ध्यान 

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

dutta jayanti

Datta Jayanti 2022 Messages in Marathi । Photo File

चरण शुभंकर फिरता तुमचे, 

मंदिर बनले उभ्या घराचे

घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले

मला ते दत्तगुरु दिसले

श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

dutta jayanti

Datta Jayanti 2022 Messages in Marathi । Photo File

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन 

श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

dutta jayanti 4

Datta Jayanti 2022 Messages in Marathi । Photo File

शिकवितो जो जगण्याचा सार 

तोच तू आमुचा एकमेव आधार

तू शिकवितो आम्ही 

कसा करावा भवसागर पार 

दत्त जयंतीच्या शुभेच्छा!

dutta jayanti 5

Datta Jayanti 2022 Messages in Marathi । Photo File

गुरूवीण कोण दाखविल वाट, 

आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट

दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

दत्त जयंती निमित्त अनेक भाविक दत्त तिर्थक्षेत्रांना भेटी देतात. दत्त मंदिरं भाविकांनी फुलतात. मात्र यंदा हे सर्व टाळणेच योग्य ठरेल. तर काही भाविक गुरुचरित्राचे पारायण करण्यात रमतात. यंदाच्या दत्त जयंती निमित्त मंदिरात गर्दी करण्याऐवजी घरात राहून नामस्मरण करणे उचित असेल. टाइम्स नाऊ मराठीकडून दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी