Dhanteras 2021: धनत्रयोदशीच्या दिवशी करा ही १३ कामे, धनात होईल १३ पट वाढ

Diwali 2021: धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी असते. प्रत्येक घरातील समृद्धी, लाभ, सुख या बाबींची दिवाळी जोडली गेलेली आहे. या दिवशी कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करतात.

Dhanteras 2021
धनत्रयोदशी 
थोडं पण कामाचं
  • धनद्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते
  • त्रयोदशी असल्यामुळेच १३ या अंकाला विशेष महत्त्व
  • धनत्रयोदशी आणि १३ या संख्येच्या शुभ संयोगामुळे होणारे लाभ

Diwali 2021: मुंबई: धनद्रयोदशीचा दिवस कार्तिक महिन्यातील त्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवाळी सणातील एक महत्त्वाचा दिवस असतो. त्रयोदशी असल्यामुळेच १३ या अंकाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या (Dhanteras)दिवशी कोणतेही काम करताना १३ या अंकाचा वापर केल्याने त्या कामापासून मिळणाऱ्या फायद्यात १३ पट वाढ होते. धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीच्या (Diwali) महापर्वाची सुरूवात होते. या दिवशी कुबेर, धन, भगवान धन्वंतरी, लक्ष्मी आणि यम यांची पूजा करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार २ ऑक्टोबर म्हणजे आज धनत्रयोदशीचा सण आहे. पाहूया धनत्रयोदशी आणि १३ या संख्येच्या शुभ संयोगामुळे होणारे लाभ. (Dhanteras 2021: Do these 13 things on Dhanteras & your wealth will rise by 13 times)

धनद्रयोदशीचे महत्त्व

धनद्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा केली जाते. धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला असा समज आहे. दिवाळी सणाचे भारतीय परंपरेत मोठे महत्त्व आहे. शिवाय हा सण काही फक्त एकच दिवस नसतो. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे आपले असे स्वत:चे एक वैशिष्टय असते. प्रत्येक व्यक्ती या सणाची आतुरतेने वाट पाहात असतो. प्रत्येक घरातील समृद्धी, लाभ, सुख या बाबींची दिवाळी जोडली गेलेली आहे. त्यामुळे दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या पूजनाचे खूप महत्त्व असते आणि ते वैशिष्ट्यपूर्णदेखील असते.

धनत्रयोदशीच्या दिवशी करायची कामे ज्यामुळे तुम्हाला होईल लाभ -

  1. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेनंतर १३ दीप प्रज्वलित करून कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करावी. असे केल्याने माता लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो आणि धनाचा लाभ होतो.
  2. ज्योतिषाचार्यांनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजनमध्ये माता लक्ष्मीला १३ कवड्या चढवली पाहिजेत. पूजेनंतर या कवड्यांना घरातील विविध विविध जागी गाडावे. असे केल्याने घरावर कधीही आर्थिक संकट येणार नाही आणि धनाचा लाभ होईल.
  3. धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीची १३ शिक्के घेऊन त्यावर हळद आणि केशरचा तिळा लावावा. पूजेनंतर या शिक्क्यांना लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवावे. असे केल्याने धन-संपत्तीत १३ पटींनी वाढ होईल.
  4. धनत्रयोदशीच्या दिवशी १३ दिवे घराबाहेर आणि १३ दिवे घरात प्रज्वलित करावेत. असे केल्याने घरातील सर्व दु:ख, अडचणी दूर होतात, बाहेर निघून जातात आणि घरात सुख, समृद्धीचे आगमन होते.
  5. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवतेची पूजा करताना पुढील कुबेर मंत्राचा १३ वेळा जप केला पाहिजे. असे केल्याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल.

कुबेर मंत्र- ऊँ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन्य धन्याधिपतये धन धान्य समृद्धि मे देहि दापय दापय स्वाहा।

(डिस्क्लेमर:  या लेखातील माहिती विविध स्त्रोतांकडून घेण्यात आली आहे. वाचकांपर्यत माहिती पोचवणे हाच याचा हेतू आहे. याचा वापर करताना मार्गदर्शन घ्यावे.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी