Diamond घालणे पडू शकतं महागात, या राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी

Gemology : हिरा घालणे हे आजकाल स्टेटस सिम्बॉल बनले आहे. विशेषतः महिलांसाठी. प्रत्येकजण फॅशनसाठी आणि आपला दर्जा टिकवण्यासाठी हिरा परिधान करतो, परंतु ज्योतिष आणि रत्नशास्त्रानुसार हिरा सर्वांना शोभ असतोच असे नाही.

Diamonds can be expensive to wear, so people of this zodiac sign should take special care
Diamond घालणे पडू शकतं महागात, या राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिरा प्रत्येकासाठी शुभ नसतो,
  • सल्ल्याशिवाय हिरा घालणे जड असू शकते
  • प्रत्येकजण फॅशनसाठी आणि आपला दर्जा टिकवण्यासाठी हिरा परिधान करतो

मुंबई : रत्न शास्त्रानुसार हिरा हा महत्त्वाच्या रत्नांपैकी एक आहे. ज्यांच्या कुंडलीत ग्रहानुसार हिरा घालण्याचा सल्ला दिला जातो, अशा लोकांनीच हिरा धारण करावा असे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हिरा परिधान केल्यास हिरा महागात पडू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी विसरुनही हिरा घालू नये. (Diamonds can be expensive to wear, so people of this zodiac sign should take special care)

हिरा प्रत्येकासाठी शुभ नसतो, सल्ल्याशिवाय हिरा घालणे अशुभ असू शकते, या राशीच्या लोकांनी घ्या विशेष काळजी

मेष : हिरा धारण केल्याने मेष राशीच्या लोकांना अडचणी येऊ शकतात. जर या लोकांना हिरा घालायचा असेल तर तो घालण्यापूर्वी एकदा तज्ञाचा सल्ला घ्या.

सिंह: हिरा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. आणि सिंह राशीच्या लोकांसाठी हिरा घालणे शुभ मानले जात नाही. सिंह राशीच्या लोकांनी हिरा धारण केला तर त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी हिरा घालणे शुभ मानले जात नाही. पण काही परिस्थितींमध्ये ज्योतिषाच्या सल्ल्याने हिरा घातला जाऊ शकतो.

मीन : मीन राशीच्या लोकांना हिरा शुभ फल देत नाही. या लोकांसाठी हिरा घालणे म्हणजे स्वतःच संकटांना आमंत्रण देण्यासारखे आहे.

धनु : या राशीच्या लोकांसाठी हिरा घालणे देखील अशुभ असते. हिरा या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या देतो आणि अनेक समस्या त्यांना घेरतात.

वृश्चिक : वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आणि हिऱ्यांशी संबंधित शुक्र ग्रह यांचे एकमेकांशी वैर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हिरा अशुभ परिणाम देतो. जर या लोकांनी कोणत्याही तज्ञाच्या सल्ल्याशिवाय हिरा घातला तर त्यांच्या आयुष्यात समस्या निर्माण होतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी