Dhanteras 2021: धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टींची करा खरेदी, घरात राहील सुख-समृद्धी

धर्म-कर्म-भविष्य
Updated Oct 27, 2021 | 16:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dhanteras 2021 Date: असं म्हटलं जात की धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. मात्र तुम्हाला माहीत आहे या दिवशी काय खरेदी करावे आणि काय नाही?

dhanteras
Dhanteras 2021: धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टींची करा खरेदी 
थोडं पण कामाचं
  • धनत्रयोदशीच्या निमित्ताने खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते
  • जाणून घ्या या दिवशी काय खरेदी करणे असते शुभ
  • धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टींची खरेदी करणे अशुभ असते. 

मुंबई: कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा(dhantrayodashi) उत्सव साजरा केला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी(laxmi mata) धनदेवता भगवान कुबेर आणि धन्वंतरीची पुजा केली जाते. यावेळी सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. असं मानलं जात की या दिवशी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. मात्र तुम्हाला माहीत आहे का या दिवशी काय खरेदी करावे आणि काय खरेदी करू नये. Do buy this things on dhanteras 

धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी खरेदी करा

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने अथवा चांदीची नाणी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लक्ष्मी देवी आणि गणपतीची मूर्तीही खरेदी केली जाते आणि दिवाळीच्या दिवशी याची पुजा केली जाते. याशिवाय या दिवशी धणे खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. हे कोथिंबीर लक्ष्मी देवीच्या पुजेत सामील कररा आणि नंतर मातीमध्ये पेरा.  

याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि पितळ खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी झाडू खरेदी करण्याची प्रथा आहे. असं मानलं जातं की लक्ष्मीचा वास झाडूमध्ये होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने लक्ष्मीचा प्रवेश होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी मातीचा दिवा खरेदी करणे शुभ मानले जाते. 

धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू नका या गोष्टी

धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू खरेदी करू नयेत. लोखंडामध्ये राहू ग्रहाची छाया असते. तसेच या दिवशी काचेचं सामानही खरेदी करू नये. काचेमध्येही राहूचा वास असते. धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. या शिवाय या दिवशी धारदार वस्तू जसे चाकू, कैचीही खरेदी करू नये. स्टीलची भांडीविकत घेण्यासही अनेकजण मनाई करतात. कारण स्टीलमध्येही अनेकदा लोखंडाचा अंशअसतो. अशा वेळेस कॉपर अथवा ब्राँझची भांडीखरेदी केली जाऊ शकतात. 

हिंदू पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला ही तिथी साजरी केली जाते. कार्तिक कृष्णपक्षाच्या त्रयोदशीला धन्वंतरी देवाने अवतार घेतला होता. त्यामुळे या दिवशी धन्वंतरीची पुजा केली जाते. या वर्षी २ नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी