Vastu Tips: सकाळी उठल्यावर चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी, प्रत्येक कामात येईल अडथळा

Vastu Tips For Morning: चला जाणून घेऊया कोणत्या 4 गोष्टी सकाळी करणे अशुभ (Inauspicious) मानले जाते.

Morning Vastu Tips
सकाळी उठल्यावर कधीही करू नका 'या' पाच गोष्टी 
थोडं पण कामाचं
  • दिवसाची सुरूवात चांगली झाली की दिवसभरातली (Morning) सर्व काम यशस्वी होतात असं म्हटलं जातं.
  • सकाळी जाणूनबुजून किंवा नकळतपणे अनेक वेळा लोकांच्या हातून अशा काही चुका होतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर आणि आरोग्यावरही होतो.
  • जाणून घेऊया कोणत्या 4 गोष्टी सकाळी करणे अशुभ (Inauspicious) मानले जाते.

नवी दिल्ली: Morning Vastu Tips: दिवसाची सुरूवात चांगली झाली की दिवसभरातली (Morning)  सर्व काम यशस्वी होतात असं म्हटलं जातं. मात्र सकाळी जाणूनबुजून किंवा नकळतपणे अनेक वेळा लोकांच्या हातून अशा काही चुका होतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर आणि आरोग्यावरही होतो. शास्त्रात अशी काही कामे सांगितली आहेत. ती सकाळी उठल्यावर अजिबात करू नयेत, नाहीतर शुभ गोष्टींऐवजी दुर्दैव सावलीसारखे मागे येते. चला जाणून घेऊया कोणत्या 4 गोष्टी सकाळी करणे अशुभ (Inauspicious) मानले जाते.

आरसा 

लोकं सकाळी उठल्या उठल्या स्वतःला आरशात पाहतात. जे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जात नाही. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. असे केल्यानं दिवसाची सुरुवात चांगली होते.

अधिक वाचा-  Shocking: एकाच घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले 6 मृतदेह

बंद पडलेलं घड्याळ 

प्रत्येक व्यक्तीचे भाग्य हे घड्याळाशी संबंधित असते. घरातील बंद घड्याळ वाईट काळ दर्शवते. शास्त्रानुसार बंद घड्याळ दिसल्याने वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रोजच्या कामात व्यत्यय येऊ शकतो.

खरकटी भांडी

सकाळी उठल्याबरोबर खरकटी भांडी पाहिल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार कमी होतो. शास्त्रानुसार रात्री स्वयंपाकघर साफ करून झोपले पाहिजे. खरकटी भांडी ठेवल्याने घरात दारिद्र्य येते.

सावली

असं मानलं जातं की, सकाळी उठल्यानंतर स्वतःच्या किंवा इतरांच्या सावलीवर पहिली नजर पडणं चांगलं नाही. सावली पाहणे हे राहूचे लक्षण मानलं जातं. सावली पाहून व्यक्तीमध्ये तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. दिवसभर कामात अडचणी येतात. एकाग्रता भंग पावते.

शिकारी प्राण्याचा फोटो

सकाळी उठल्या उठल्या गाय दिसली तर ती खूप शुभ मानली जाते. मात्र शास्त्रानुसार पहाटेची पहिली नजर हिंसक प्राण्याच्या फोटोवर पडू नये. असं मानलं जातं की, यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी