Vastu Shastra: जेवल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' काम; लक्ष्मी होईल नाराज; बसेल मोठा फटका

Vastu Tips for Money: प्रत्येक काम योग्य पद्धतीने करण्याचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितले आहे. यानुसार जेवण केल्यानंतर ताटात हात धुतल्याने लक्ष्मी देवी कोपते.

Vastu Tips for Money
जेवल्यानंतर चुकूनही करू नका 'हे' काम, व्हाल कंगाल 
थोडं पण कामाचं
  • खाण्यापिण्याच्या (Eating and drinking) बाबतीत लोकांच्या वेगवेगळ्या सवयी असतात.
  • जेवण बनवण्यापासून ते जेवण जेवेपर्यंत आणि त्यानंतर पाळायचे नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत.
  • धनाची देवी लक्ष्मी जर रागावली तर ती माणसाला गरीब बनवते.

मुंबई: Vastu Tips for Eating Food in Marathi: खाण्यापिण्याच्या (Eating and drinking) बाबतीत लोकांच्या वेगवेगळ्या सवयी असतात.  हे सर्व काही वेळ, पद्धत, खाण्याचे ठिकाण इत्यादीशी संबंधित आहेत. यातील अनेक गोष्टी योग्य आहेत तर काही चुकीच्याही आहेत. जेवण बनवण्यापासून ते जेवण जेवेपर्यंत आणि त्यानंतर पाळायचे नियम वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. चुकीच्या पद्धतीनं जेवल्यामुळे झालेल्या चुकीमुळे देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) राग येऊ शकतो. धनाची देवी लक्ष्मी जर रागावली तर ती माणसाला गरीब बनवते. तुम्हालाही अशी वाईट सवय (bad habit) असेल तर लगेच सोडून द्या.

जेवणाच्या ताटात कधीही धुवू नका हात

जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची अनेकांना सवय असते. असे करणे अत्यंत चुकीचे आहे. ताटावर घाणेरडे हात धुण्याच्या या सवयीमुळे देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होतात. माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांची नाराजी माणसाला दरिद्री बनवू शकते. या कृतीने घरात दारिद्र्य येते. त्यामुळे ही सवय लगेच सोडा.

अधिक वाचा- दोन तरूणांकडून कांदिवलीत Firing, एक ठार; तीन जखमी

या गोष्टी लक्षात ठेवा

  • जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी मिळवायचा असेल तर स्वयंपाकघर आणि जेवणाशी संबंधित काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
  • रात्रीच्या वेळी किचनमध्ये घाणेरडी भांडी ठेवू नका, तसेच घाण ठेवू नका. रात्री स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा.
  • स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ दिवा लावा, यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
  • अंघोळ केल्यावर नेहमी अन्न शिजवा आणि पहिली पोळी गाईला खाऊ घाला. तसेच, शेवटची भाकरी कुत्र्याला द्या.
  • दक्षिणेकडे तोंड करून जेवण कधीही खाऊ नका. उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून जेवायला बसणे खूप शुभ आहे.
  • अन्न कधीही वाया घालवू नका. ताटात जेवढे हवे तेवढेच घ्या.
  • गरिबांना अन्न द्या.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी