Surya Grahan 2022: सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही करू नका 'हे' काम, नाहीतर...

Solar eclipse: भारतात हे सूर्यग्रहण संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. म्हणूनच प्रत्येकाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Solar eclipse
सूर्यग्रहण सुरू होताच चुकूनही करू नका 'ही' कामं 
थोडं पण कामाचं
  • आज रात्रीपासूनच सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी खास आहे.
  • सूर्यमालेतील या अतिशय खास घटनेबद्दल सांगायचे तर 2022 मधील असे हे पहिलेच सूर्यग्रहण आहे.
  • भारतात हे सूर्यग्रहण संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल.

मुंबई: Last Surya Grahan 2022: 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण (solar eclipse) 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आज देशभरात दिवाळी (Diwali) साजरी होत असून आज रात्रीपासूनच सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी खास आहे. सूर्यमालेतील या अतिशय खास घटनेबद्दल सांगायचे तर 2022 मधील असे हे पहिलेच सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध असेल.

अद्भुत खगोलीय घटना

भारतात हे सूर्यग्रहण संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. त्यामुळे भारतातील सुतक कालावधी 25 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजल्यानंतर वैध असेल. असं म्हटलं जात की,  सूर्यग्रहणाच्या वेळी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

अधिक वाचा-  सिनेप्रेमींसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा असणार खूप स्पेशल 

ग्रहण काळात हे काम करू नका

शास्त्रानुसार सूर्यग्रहण काळात काहीही खाल्ल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, या काळात शिजवलेले अन्न खाण्यास मनाई आहे. या दरम्यान, कापण्याचे आणि सोलण्याचे काम देखील निषिद्ध मानले जाते. या काळात नखे कापणे, कंगवा करणे देखील शुभ मानले जात नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे ग्रहणकाळात कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य सुरू करू नये. सुतक लावण्यापूर्वी पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने आणि घरात तयार केलेले अन्नपदार्थ ठेवावेत.

गर्भवती महिलांनी लक्ष देणे आवश्यक

ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, तसेच या काळात चाकू, कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू वापरू नये. यासोबत सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे. कारण असे मानले जाते की या सर्व गोष्टी केल्याने मुलावर वाईट परिणाम होतो.

'ग्रहण काळात प्रवास टाळा'

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण काळात झोपू नये असे सांगितले आहे. याशिवाय ग्रहणकाळात यात्रा सुरू करू नये. आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वी 30 एप्रिल रोजी सूर्यग्रहण झाले होते, जे भारतात दिसलं नव्हते.


(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पौराणिक कथा आणि श्रद्धांवर आधारित आहे. या उपायांचा किंवा पद्धतींचा अवलंब करण्यापूर्वी, तुम्ही योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. Time Now Marathi याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी