Pitru Paksha 2022: पितृपक्षात चुकूनही करू नका 'हे' काम नाहीतर पूर्वजांना होतील नाराज

Pitru Paksha 2022: पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष यावर्षी 10 सप्टेंबरपासून सुरू होत असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. तसेच पितृ पक्षातील संपूर्ण 16 दिवस तिथीनुसार पितरांचे पिंड दान केले जाते.

Pitru Paksha 2022
पितृपक्ष विसरूनही हे काम करू नका 
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात (Hinduism) पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे.
  • पितृपक्षात मृत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, दान आणि पिंड दान केले जाते.
  • पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष यावर्षी 10 सप्टेंबरपासून सुरू होत असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

मुंबई: Pitru Paksha 2022: हिंदू धर्मात (Hinduism) पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात मृत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण, दान आणि पिंड दान केले जाते. पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्ष यावर्षी 10 सप्टेंबरपासून सुरू होत असून 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. तसेच पितृ पक्षातील संपूर्ण 16 दिवस तिथीनुसार पितरांचे पिंड दान केले जाते. (Do not do this work on Pitru Paksha 2022 read in marathi) 

पितृ पक्ष किंवा श्राद्ध 10 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 25 सप्टेंबरपर्यंत चालेल. या दरम्यान लोक पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध विधी करतात. पितृपक्षात मृत पूर्वजांचे आत्मा पृथ्वीवर येतात असं म्हटलं जातं. तसंच याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होऊ शकतो. अशा स्थितीत लोक श्राद्ध विधी करतात. दरम्यान पितृ पक्षाचे काही नियम आहेत, ज्यांचे चुकूनही उल्लंघन करू नये.

हे आहेत नियम 

पितृ पक्षामध्ये तांदूळ, मांस, लसूण, कांदा आणि बाहेरचे अन्न खाणे टाळावे. यावेळी वांग्याची भाजीही खाऊ नये. सात्विक आहार घ्या. याशिवाय मसूर, काळी उडीद, हरभरा, काळे जिरे, काळे मीठ, काळी मोहरी आणि कोणतेही अशुद्ध किंवा शिळे अन्न श्राद्धात वापरू नये.

अधिक वाचा-  हातावर असतील 'अशा' रेषा तर लग्नानंतर चमकेल नशीब

ज्या व्यक्तीला पितृ पक्षात श्राद्ध करावे लागते. त्याने आपले केस, दाढी आणि नखे देखील कापू नयेत. या दरम्यान, न धुलेले आणि घाणेरडे कपडे घालणे देखील टाळावे. तसंच चामड्याचे काहीही परिधान करू नये. अगदी चामड्याची पर्स किंवा पाकीटही जवळ ठेवू नये.

श्राद्ध करताना मंत्रांचा जप करत असताना कोणीही थांबवलं तरी थांबू नका. हे पूर्ण केल्यानंतर इतर कामे करा. पितृपक्षात तंबाखू, सिगारेट, दारू, गुटखा यांचे सेवन टाळावे. या काळात कोणत्याही प्रकारचे व्यसन केल्यानं फळ मिळत नाही.

श्राद्धाच्या दिवशी कर्म करणाऱ्या व्यक्तीने वारंवार अन्न खाणे टाळावे. असे करणे चांगले मानले जात नाही. यामुळे वडिलांना राग येतो, असं म्हटलं जातं. पूजेसाठी लोखंडी भांडी वापरू नका. त्याच्या जागी, सोने, चांदी, तांबे किंवा पितळेची भांडी वापरली जाऊ शकतात.

अधिक वाचा- स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचे आगमन, खास आहे ही गणरायाची पारंपरिक मूर्ती 

दरम्यान पितृ पक्षाच्या काळात नवीन वस्तू खरेदी करणे टाळावे. गरज भासल्यास नवीन कपडे घेऊ नका किंवा घालू नका. कोणत्याही प्रकारचे उत्सव करणे देखील टाळले पाहिजे. एखाद्याचा वाढदिवस असला तरीही ते टाळावं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी