Artificial Flowers: घरात आर्टिफिशियल फूल ठेवणे योग्य असते का? जाणून घ्या

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jul 06, 2022 | 12:50 IST | टाइम्स नाऊ मराठी

Artificial Flowers: आजकाल घर सजवण्यासाठी आर्टिफिशियल फुले लावली जातात. ही आता सामान्य बाब झाली आहे. मात्र वास्तुशास्त्राच्या हिशेबाने हे योग्य आहे का. घ्या जाणून...

artificial flowers
घरात आर्टिफिशियल फूल ठेवणे योग्य असते का? जाणून घ्या 
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्राबद्दल बोलायचे झाल्यास घरात खोटी फुले अथवा आर्टिफिशियल गोष्टी लावू नयेत
  • याच कारणामुळे आर्टिफिशयल गोष्टींना खऱ्या गोष्टीसारखे फिलिंग येत नाही.
  • यामुळे कुटुंबातील खरा आनंदही खोटा वाटू लागतो. कुटुंबात क्लेश वाढू लागतो

मुंबई: जेव्हा घर सजवण्याचे ठरवले जाते तेव्हा अनेक प्रकारचे प्रयोग केले जातात. यासाठी अनेक आर्टिफिशयल वस्तूही घरासाठी खरेदी केल्या जातात. कारण खऱ्याखुऱ्या वस्तुंपेक्षा या गोष्टी जास्त टिकतात. यात आर्टिफिशियल फुलांचाही समावेश होतो. मात्र वास्तुच्या हिशेबाने हे करणे योग्य आहे का? घरात सजावटीसाठी खोटी फुले खरेदी करणे योग्य असते का? असे केल्याने लक्ष्मी मातेचा प्रवेश होतो का? का अशा गोष्टींमुळे दारिद्रय येते का?Do not keep artificial flowers in home

अधिक वाचा - हातावर असेल ही 'धन रेषा' तर तुम्हाला मिळेल बक्कळ पैसा

कुटुंबात वाढू लागतो क्लेश

वास्तुशास्त्राबद्दल बोलायचे झाल्यास घरात खोटी फुले अथवा आर्टिफिशियल गोष्टी लावू नयेत. याच कारणामुळे आर्टिफिशयल गोष्टींना खऱ्या गोष्टीसारखे फिलिंग येत नाही. यामुळे कुटुंबातील खरा आनंदही खोटा वाटू लागतो. कुटुंबात क्लेश वाढू लागतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होऊ लागतात. यामुळे घरात अशांती पसरते. 

घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश 

ज्योतिषानुसार आर्टिफिशियल म्हणजेच खोटी फुले घरात आणल्याने घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो. ही नकारात्मक उर्जा लवकरच घरातील कुटुंबियांना आपल्या वशमध्ये करते. यामुळे झालेली कामेही बिघडू लागतात. या खोट्या फुलांच्या प्रभावाने तुम्ही नेहमी चिडचिडे होऊ लागतात. तसेच यामुळे घरात नकारात्मक वातावरणही वाढते. 

आरोग्यावर होतो परिणाम

घरात खोटे फूल खरेदी करून आणल्याने केवळ नकारात्मक उर्जाच घरात येत नाही तर यामुळे कुटुंबियांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. आर्टिफिशियल फुलांमुळे डोकेदुखी, मायग्रेन, मानसिक तणाव, चक्कर येणे, ताप यासारख्या समस्या वाढू लागतात. खासकरून महिलांना हे त्रास होतात. यासाठी नकली फुले आणू नयेत. 

अधिक वाचा - CM शिंदे विधानसभेत भावूक झाले, राऊत म्हणाले आव आणला!

दिखावा करण्याची सवय 

वास्तुनुसार घरात खोटी फुले लावल्याने कुटुंबातील लोकांमध्ये खोटे बोलणे आणि दिखावा करण्याची सवय वाढते. यामुळे ते खऱ्या दुनियेपासून दूर खोट्या दुनियेत वावरू लागतात. खोटी फुले घरातील लोकांमध्ये आपापसातील स्नेह कमी करते आणि दुरावा वाढतो. याच कारणामुळे घरात हे लावण्यास मनाई असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी