Vastu Tips: चुकून सुद्धा घरात ठेवू नका 'या' 3 गोष्टी, नेहमी डोक्यावर घोंघावेल आर्थिक संकट

Vastu Tips For Home: वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो.

Vastu Tips In marathi
चुकून सुद्धा या 3 गोष्टी घरात ठेवू नका  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • वास्तूमध्ये काही गडबड झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होत असतो.
  • घरात ठेवलेल्या या वस्तूंमुळे कलह वाढतो आणि यामुळे लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
  • वास्तूमध्ये काही गडबड झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होत असतो.

मुंबई: Vastu Tips In Marathi: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वास्तुशास्त्राला (Vastu) खूप महत्त्व असते. वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडत असतो. वास्तूमध्ये काही गडबड झाल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यावरही त्याचा परिणाम होत असतो. त्यानंतर त्या व्यक्तीला आरोग्य (health), आर्थिक (financial problems)  या आणि अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. असंच काहीसं वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो.

बऱ्याचदा असं होतं की, आपण घरात ठेवलेल्या काही गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण त्या गोष्टींचा घरात नकारात्मक परिणाम होत असतो. राहु-केतू आणि शनि अशा गोष्टींमध्ये राहण्यायोग्य बनतात ज्या दीर्घकाळ वापरत नाहीत. असं म्हटलं जातं की घरात ठेवलेल्या या वस्तूंमुळे कलह वाढतो आणि यामुळे लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात.

अधिक वाचा-  यंदा बाप्पाला दाखवा चूरमा लाडूचा प्रसाद, सोपी रेसिपी

बंद पडलेले घड्याळ 

भिंतीवर टांगलेले घड्याळ खराब झाले तर अनेकदा लोक ते काढून घराच्या कोपऱ्यात ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेले कोणतेही बंद घड्याळ माणसावर वाईट वेळ आणते. अशी घड्याळे तुम्ही दान केलीत तर ते तुमच्यासाठी चांगले असेल. 

गंजलेल्या वस्तू 

घरात पडून असलेली जुनी लोखंडी अवजारे वापरली नाहीत तर त्यांना गंज लागण्यास सुरूवात होते. वास्तुशास्त्रानुसार अशी गंजलेल्या गोष्टी घरात ठेवल्याने अडचणी आणि समस्या वाढतात. वास्तूनुसार गंज लागल्यानंतर ती अवजारे किंवा गोष्टी आणखी धोकादायक बनतात.

पितळेची भांडी

अनेकदा लोक पितळेची जुनी भांडी स्टोअर रूम किंवा किचनमध्ये बंद ठिकाणी ठेवतात. ही भांडी अंधारात ठेवल्याने शनीचा प्रवेश होतो आणि जीवनात समस्या येण्यास सुरू होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी