Vastu Tips : दुसऱ्यांच्या या 5 गोष्टी चुकूनही नका वापरू...येऊ शकते मोठे संकट

Vastushastra Tips : अनेकदा तुम्ही वडिलधाऱ्यांकडून ऐकले असेल की, इतरांच्या वस्तू कधीही विचारून वापरू नयेत. वास्तुशास्त्रातही असे करण्यास मनाई आहे. वास्तूनुसार, इतरांच्या काही गोष्टींचा वापर केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा (Negative energy)आपल्यामध्ये राहते. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या, वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra), कोणकोणत्या वस्तू इतरांकडे मागवून वापरू नयेत.

Vastu Tips to avoid loss
दुसऱ्यांचा या वस्तू कधीही वापरू नयेत 
थोडं पण कामाचं
  • इतरांच्या वस्तू अनेकदा वापरण्याची सवय
  • मात्र वास्तूशास्त्रानुसार इतरांच्या काही वस्तू वापरल्याने येऊ शकते संकट
  • यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते

Vastu Tips to avoid loss : नवी दिल्ली : अनेकदा तुम्ही वडिलधाऱ्यांकडून ऐकले असेल की, इतरांच्या वस्तू कधीही विचारून वापरू नयेत. वास्तुशास्त्रातही असे करण्यास मनाई आहे. वास्तूशास्त्रानुसार, इतरांच्या काही गोष्टींचा वापर केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा (Negative energy)आपल्यामध्ये राहते. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या, वास्तुशास्त्रानुसार (Vastushastra), कोणकोणत्या वस्तू इतरांकडे मागवून वापरू नयेत. (Do not use these 5 things of others to avoid money loss as Vastu Shastra)

अधिक वाचा : Vastu Tips:तुम्हाला सतत पैशाची तंगी सतावतेय का? दूर करतील या टिप्स

1. रुमाल- वास्तुशास्त्रानुसार रुमाल दुसऱ्या व्यक्तीचा रुमाल आपण घेतल्याने किंवा आपल्याजवळ ठेवल्याने नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. त्याचा संबंध वादाशीही होताना दिसत आहे. म्हणूनच दुसऱ्याचा रुमाल कधीही स्वत:कडे ठेवू नका.

2. घड्याळ- वास्तुशास्त्रात घड्याळाला सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्हींशी जोडलेले मानले जाते. मनगटावर दुसऱ्याचे घड्याळ घालणे अशुभ मानले जाते. असे केल्याने माणसाचा वाईट काळ सुरू होतो असे म्हणतात.

3. अंगठी- एखाद्या व्यक्तीची अंगठी आपण घालणे याला वास्तूमध्ये अशुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर, आयुष्यावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो असे म्हणतात.

अधिक वाचा : Vastu : घरात ठेवलेल्या या 7 गोष्टींमुळे होते माणसाचे अशुभ, घरात येते नकारात्मक ऊर्जा, नुकसान होण्यापूर्वी काढा घराबाहेर

4. पेन- वास्तुशास्त्रानुसार कोणीही दुसऱ्या व्यक्तीचे कधीही पेन स्वत:कडे ठेवू नये. असे केल्याने करिअरवर वाईट परिणाम होतो असे म्हणतात. यामुळे धनहानी देखील होऊ शकते.

5. कपडे- वास्तूनुसार कोणत्याही व्यक्तीने कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. असे केल्याने आपल्यात नकारात्मकता येते आणि जीवनात अडचणी येतात असे म्हणतात.

अधिक वाचा : Astro Tips to get your money back : उधार दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी करायचे उपाय

घराच्या बांधकामापासून ते सजावटीपर्यंत अनेक गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत, ज्यांचा थेट संबंध माणसाच्या सुख-समृद्धीशी आहे. वास्तूनुसार अनेक वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते. घरात ठेवलेल्या या वस्तू व्यक्तीच्या अशुभ स्थिशी संबंधित मानल्या जातात. ते घरात नकारात्मक ऊर्जा आणतात.

भरपूर पैसा, सुख-सुविधा मिळवण्यासाठी सगळीच माणसे प्रयत्न करतात. मात्र अनेकदा भरपूर प्रयत्न करूनही ते यशस्वी होत नाहीत. यामागे अनेक कारणे जबाबदार असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. वास्तुशास्त्रात(vastu shastra) अनेक अशा गोष्टी सांगण्यात आल्यात ज्या कंगालीचे कारण ठरतात. काही चुका या व्यक्तीच्या आर्थिक स्थिती, प्रगती आणि यशामध्ये अडथळा ठरतात. जर तुम्ही अशा बाबी जाणून घेतल्या  तर तुम्हाला चांगली आर्थिक प्रगती करता येते. तुमची दिनचर्या कशी आहे, तुमच्या सवयी काय आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ माहिती देण्याचा आहे. टाईम्स नाऊ याच्याशी सहमत असेलच असे नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी