Chanakya Niti: चाणक्य नितीच्या या ३ गोष्टींचे केले पालन तर गुडघे टेकण्यास भाग पडेल शत्रू

धर्म-कर्म-भविष्य
Updated Dec 27, 2021 | 18:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chanakya Niti:चाणक्य नितीमध्ये जीवनाच्या यशाची अनेक सूत्रे दिलेली आहेत. याशिवाय या नितींमध्ये शत्रूंवर कसा विजय मिळवावा याचेही अचूक मंत्र सांगितले आहेत. जाणून घ्या शत्रूवर विजय मिळवण्याबाबत काय सांगते चाणक्य निती...

chanakya
चाणक्य नितीच्या ३ गोष्टींचे केले पालन तर गुडघे टेकेल शत्रूू 
थोडं पण कामाचं
  • चाणक्य नितीमध्ये शत्रूवर विजय मिळवण्याबाबत सांगितलेत मंत्र
  • चाणक्य यांनी सांगितलेय शत्रूला कधीही घाबरू नये
  • आचार्य चाणक्यनुसार शत्रूला कधीही कमी समजू नये.

मुंबई: आचार्य चाणक्य निती(chanakya niti) आजही हजारो वर्षानंतरही प्रासंगिक आहे. आयुष्यातील प्रत्येक समस्या आणि त्याचे उत्तर आपल्याला आचार्य चाणक्य नितीमध्ये सापडते. चाणक्य निती मनुष्याच्या जीवनाला यशस्वी(successful life) बनवते. तर शत्रूवर विजय मिळवण्यासाठी या नितीमध्ये अचूक मंत्र(mantra) दिले आहेत. हे वापरून तुम्ही शत्रूवर(enemy) विजय मिळवू शकता. do this 3 things to conquer your enemy says Chanakya niti

आचार्य चाणक्य (Chanakya Niti) नुससार मनुष्याला जर शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर कधीही त्याला घाबरू नये. तुम्ही त्याच्यापेक्षा कसे ताकदवान व्हाला याचा विचार केला पाहिजे. चाणक्य नितीमध्ये या बाबी सांगितल्या आहेत की शत्रू कितीही ताकदवर असला तरी त्याच्यासमोर कधीही गुडघे टेकू नयेत. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण मानसिकरित्या कणखर असले पाहिजे. नेहमी तुमचाच विजय व्हावा हे गरजेचे नाही. मात्र जरी तुमचा पराभव झाला तरी त्यातून तुम्ही शिका आणि तुमच्या चुका सुधरा. 

आपली योजना कोणालाही सांगू नये

आचार्य चाणक्यनुसार शत्रूला कधीही कमी लेखू नये. जर शत्रूच्या ताकदीचा तुम्हाला योग्य आकलन झाले तर तुम्ही विजय निश्चित करू शकता. शत्रूला कमी लेखण्याची चूक केली तर तो तुमच्या प्रत्येक कमजोरीवर वार करण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय समजूतदार व्यक्ती आपल्या योजना कधीही कोणासोबत शेअर करत नाहीत. जेव्हा योजना पूर्ण होतात तेव्हा सगळ्यांना सांगा. 

Chanakya Niti : अगर चाहते हैं जीवन में न रहे कोई समस्या, तो आचार्य की ये 10 बातें याद रखें | Chanakya Niti | TV9 Bharatvarsh

यावेळेस अधिक व्हा सतर्क

जर तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा जास्त ताकदवर दिसत असेल तर ते अधिक धोकादायक असते. जर शत्रू अधिक ताकदवान असेल तर तुम्ही लपून त्याला हरवण्याची योजना बनवू शकता. शत्रूशी लपून तुम्ही स्वत:ची शक्ती वाढवू शकता. तसेच शत्रूच्या गतिविधींकडेही दुर्लक्ष करू नकाय 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी