Astro Tips : सकाळी केलेला हा गाईचा उपाय नशीब उजळून टाकतो...दुःख होतात दूर

Astrology 2022 : भारतीय परंपरेत गाईचे मोठे महत्त्व आहे. गाय ही अत्यंत पूजनीय समजली जाते. गाईमध्ये देवतांचा वास असल्याची मान्यता आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने गाईशी (Cow) संबंधित काही उपाय नियमितपणे केले तर त्याला जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. ग्रहांची स्थिती आणि भाग्य यासंदर्भात ज्योतिषशास्त्रात (Astrology) विस्ताराने सांगण्यात आले आहे.

Astrology 2022
ज्योतिषशास्त्र 
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि ग्रहदशेचे महत्त्व
  • गाईच्या पूजेचे मोठे महत्त्व
  • गाईच्या पूजेने सुख समृद्धी मिळण्याची मान्यता

Cow Jyotish for Prosperity : नवी दिल्ली : जीवनचक्रात सुख आणि दु:ख प्रत्येकाच्याच वाट्याला येत असते. मात्र ग्रहांची स्थिती आणि भाग्य यासंदर्भात ज्योतिषशास्त्रात (Astrology) विस्ताराने सांगण्यात आले आहे. त्यातही भारतीय परंपरेत गाईचे मोठे महत्त्व आहे. गाय ही अत्यंत पूजनीय समजली जाते. गाईमध्ये देवतांचा वास असल्याची मान्यता आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने गाईशी (Cow) संबंधित काही उपाय नियमितपणे केले तर त्याला जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. विविध मान्यतांनुसार गायीची पूजा (Cow Puja) करून तिच्याशी संबंधित उपाय केल्यास त्या व्यक्तीला  सुख-समृद्धी प्राप्त होते. त्याचा भाग्योदय होतो. आज आपण अशाच काही उपयुक्त उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, जे रोज केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते. (Do this Cow Puja to get prosperity and wealth in life)

अधिक वाचा : भारतीयांना 719 रुपयांत मिळेल ट्विटरची ब्ल्यू टिक

भारतीय परंपरेत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतांनुसार नियमितपणे गाईची सेवा केल्यास व्यक्तीला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही. असे मानले जाते की गाईशी संबंधित सर्व वस्तू जसे की दूध, मूत्र, शेण इत्यादी गोष्टी गाईप्रमाणेच शुभ मानल्या जातात. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने रोज सकाळी गाईशी संबंधित काही उपाय केले तर त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. गाईची पूजा करणाऱ्याच्या सर्व दु:ख आणि वेदना दूर होतात असे मानले जाते.

गाईशी संबंधित ज्योतिषीय उपाय 

गाईची पूजा रोज करावी अशी मान्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार दररोज सकाळी स्नानानंतर गाईची पूजा करावी. असे केल्याने सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. गाईमध्ये देवी-देवतांचा वास असल्याची मान्यता आहे आणि असे पुराणात म्हटल्याचे सांगितले जाते.

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

गाईची पूजा करणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात आर्थिक भाग्योदय होतो. शिवाय त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही, असे मानले जाते. असे करणार्‍यांवर लक्ष्मीची नेहमीच कृपा राहते आणि त्याला संपत्तीचा लाभ मिळतो. 

बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने व्यक्तीच्या जीवनात कोणतेही संकट येत नाही, असे म्हटले जाते.

गाईच्या पाठीवर पसरलेल्या भागाची काळजी घेतल्याने व्यक्तीचे रोगांपासून संरक्षण होते असे मानतात. हे स्थान सूर्य-केतू नाडी असल्याचे सांगितले जाते. यामुळे व्यक्तीचे आरोग्य चांगले होते.

अधिक वाचा - Parenting Tips: या 5 गोष्टींचा मुलांवर होतो विपरित परिणाम...टाळा या चुका

शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदशा कमकुवत असेल आणि अनेक संकटे येत असतील तर गाईच्या पूजा करण्यास सांगितले आहे. अशा व्यक्तीने   काळ्या गाईची पूजा करावी. असे केल्याने ग्रहांचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि सुख समृद्धी मिळते. तसेच त्या व्यक्तीला शत्रूंवर विजय मिळवता येतो अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी