Hartalika 2022: लग्नात येताहेत अडथळे?, जोडीदारासोबत Breakup?; हरितालिका व्रताच्या दिवशी करा 'हे' उपाय; सर्व अडचणी होतील दूर

Hartalika 2022: हरितालिकेचे व्रत जोडीदारासाठी खूप महत्त्वाचे आहे. सुखी वैवाहिक जीवन आणि चांगला नवरा मिळावा यासाठी महिला आणि मुली हे व्रत करतात.

Hartalika 2022
हरितालिका व्रत 
थोडं पण कामाचं
  • भाद्रपद महिन्यातील (Bhadrapada) शुक्ल पक्षातील (Shukla Paksha) तृतीयेला हरितालिकेचा उपवास केला जातो.
  • हरतालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीचा उद्देश देवी पार्वती (Goddess Parvati) आणि भगवान शिव यांना तिच्या व्रत आणि उपासनेने प्रसन्न करणे हा असतो.
  • काही जण इच्छित वराच्या इच्छेने निर्जळ व्रत ठेवतात.

नवी दिल्ली: Hartalika 2022 in Marathi: भाद्रपद महिन्यातील (Bhadrapada)  शुक्ल पक्षातील (Shukla Paksha) तृतीयेला हरितालिकेचा उपवास केला जातो. यावर्षी 30 ऑगस्ट 2022, मंगळवारी हरितालिका आहे. हरितालिकेच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीचा उद्देश देवी पार्वती (Goddess Parvati) आणि भगवान शिव यांना तिच्या व्रत आणि उपासनेने प्रसन्न करणे हा असतो. जेणेकरून त्याच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात. काही जण आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात, तर काही जण इच्छित वराच्या इच्छेने निर्जळ व्रत ठेवतात. हा उपवास विवाहित महिला आणि अविवाहित मुली (Unmarried Girls) दोन्ही करतात. (Do this measures of Hartalika will remove every difficulty in marriage and love read in marathi) 

या व्रतामुळे पतीला दीर्घायुष्य मिळते तर इच्छित पती प्राप्त होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते. दरम्यान ज्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार अडथळे येत आहेत किंवा त्यांचे कोणाशी तरी संबंध तोडले आहेत, त्यांनी या दिवशी काही खास उपाय करावेत. लवकरच त्यांना चांगला आणि मनासारखा जोडीदार मिळेल.

अधिक वाचा-  अंतराची मंगळागौर, मल्हारसोबत Romantic फोटोशूट

हरितालिका व्रताचे उपाय

  1. हरितालिकाच्या दिवशी निर्जळ व्रत ठेवा. भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधीपूर्वक पूजा करा. या वेळी शिवाला बेलची पाने, धोत्रा, आक फुले आणि पांढरे वस्त्र अर्पण करावे. दुसरीकडे, देवी पार्वतीला लाल व्रस्त्र आणि श्रृगांर अर्पण करा. असं केल्यानं विवाह लवकर होतो आणि चांगला जोडीदार मिळतो.
  2. हरितालिकच्या दिवशी पूजा केल्यानंतर देवी पार्वतीची आरती करा - 'जय-जय गिरिराज किशोरी...'. धर्मग्रंथानुसार माता सीतेने आपल्या स्वयंवरापूर्वी ही आरती केली होती आणि तिच्या प्रभावामुळे त्यांना भगवान श्री रामसारखा योग्य वर मिळाला. शक्य असल्यास देवी पार्वतीची रोज पूजा करून ही आरती करावी. यामुळे लवकरच एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत लग्न होईल.
  3. हरितालिकेच्या दिवशी एखाद्या विवाहित महिलेला श्रृंगारचे सामान नक्कीच अर्पण करा.

हरितालिकेच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीला केशरमिश्रित गाईच्या दुधाचा अभिषेक करा. या दरम्यान, ओम नमः मनोभिलाषितं वरं देही वरं हरी ओम गोरा पार्वती देवाय नमः या मंत्राचा जप करत रहा. लवकरच सर्व अडथळे दूर होतील आणि सनई वाजतील.

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi त्याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी