Astrology 2022 : गुरुवारची अशी पूजा केल्यास मिळेल लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वाद...मिळेल धनसंपत्ती, अशी करा पूजा

Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) नऊ ग्रहांमध्ये मंगल आणि सौभाग्य देणारा ग्रह म्हणजे गुरू असतो. जगाचे पालनपोषण करणारा भगवान विष्णू (Vishnu)यांच्या पूजेसाठी गुरुवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अशी मान्यता आहे की गुरुवारी (Thursday) केलेल्या पूजेने जीवनाशी संबंधित दु:ख दूर होतात. पूजा करून केवळ भगवान गुरु नव्हे तर तसेच भगवान श्री विष्णूच्या आशीर्वादाने धनसंपत्ती (Prosperity) मिळू शकते.

Astrology 2022
ज्योतिषशास्त्र 2022 
थोडं पण कामाचं
  • भारतीय पंरपरेत प्रत्येक तिथीचे स्वतंत्र महत्त्व
  • नऊ ग्रहांमध्ये मंगल आणि सौभाग्य देणारा ग्रह म्हणजे गुरू
  • गुरुवारी (Thursday) केलेल्या पूजेने जीवनाशी संबंधित दु:ख दूर होतात

Astrology 2022 : नवी दिल्ली : भारतीय परंपरेत, प्रत्येक दिवस, प्रत्येक तिथीचे स्वतंत्र महत्त्व आहे. प्रत्येक तिथी ही कोणत्या ना कोणत्या देवतेसाठी आणि त्यामुळे त्या देवतेच्या पूजेसाठी समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) नऊ ग्रहांमध्ये मंगल आणि सौभाग्य देणारा ग्रह म्हणजे गुरू असतो. जगाचे पालनपोषण करणारा भगवान विष्णू (Vishnu)यांच्या पूजेसाठी गुरुवार हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अशी मान्यता आहे की गुरुवारी (Thursday) केलेल्या पूजेने जीवनाशी संबंधित दु:ख दूर होतात. अनेकदा खूप परिश्रम आणि प्रयत्न करूनही संकटे येत राहतात. अनेक गोष्टी साध्य होत नाहीत. अशावेळी साधी आणि खात्रीपूर्वक पूजा करून केवळ भगवान गुरु नव्हे तर तसेच भगवान श्री विष्णूच्या आशीर्वादाने धनसंपत्ती (Prosperity) मिळू शकते. त्याचबरोबर लक्ष्मीदेखील तुमच्यावर प्रसन्न होऊ शकते. ही पूजा कशी करायची ते पाहूया. (Do this puja on Thursday to get blessings of Laxmi)

अधिक वाचा - Diabetes Control : वयाच्या 40-50 व्या वर्षी फास्टिंग शुगर 100-125mg/dl असेल तर आहे मधुमेहाचा धोका...पाहा कसे कराल नियंत्रण

गुरुवारची पूजा ही एक खास असते. या पूजेमध्ये हळदीचा वापर करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही गुरुवारी भगवान विष्णू किंवा देवगुरु बृहस्पतीची पूजा करत असाल तर त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हळद अर्पण केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. यासाठी पाण्यात हळद मिसळा आणि घराच्या मुख्य दरवाजासह प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. हळदीचा वापर करून पूजा केल्याने घरात सुख नांदते अशी मान्यता आहे. 

लक्ष्मी आणि विष्णूची पूजा

गुरुवारी लक्ष्मी आणि विष्णूच्या आराधनेसाठी केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. कारण हा रंग गुरुचे प्रतिनिधित्व करतो. भगवान श्री विष्णूच्या पूजेमध्ये पिवळे फूल आणि वस्त्र अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते. म्हणूनच तुम्ही गुरुवारच्या पूजेमध्ये पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी हळद, पिवळी फळे भगवान विष्णूला अर्पण करावीत. याचा तुम्हाला विशेष फायदा होईल.

अधिक वाचा  : तुरुंगात बाहेर येताच संजय राऊतांना कोणाचा फोन?

अशीही मान्यता आहे की गुरुवारी भगवान श्री विष्णूच्या मंदिरात जाऊन पूजा करावी. असे करताना विष्णूला पिवळ्या रंगाची कुंडी अर्पण करावीत. त्यामुळे विवाहात येणारे सर्व अडथळे दूर होतात.

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, झाडे आणि वनस्पतींना देवतेचेच स्थान दिले आहे. त्यांची उपासना आणि सेवा केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळते. असे मानले जाते की जर तुम्ही गुरुवारी पाण्याने तुळशी, केळी आणि पिंपळाची पूजा केली तर श्री हरी विष्णूच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

भारतीय परंपरेत मंत्रजपाचे खूप मोठे माहात्म्य आहे. मंत्रजाप अत्यंत फलदायी मानला जातो. म्हणूनच गुरूची आणि विष्णूची पूजा करताना गुरुवारी भगवान श्री विष्णूच्या 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' आणि देवगुरु बृहस्पती 'ओम बृहस्पतये नमः' या मंत्राचा जप करावा. या दोन्ही मंत्रांचा जप चंदन किंवा तुळशीच्या माळाने करणे योग्य ठरते. असे केल्यास त्याचे चांगले फळ मिळते आणि प्रगती होते असे मानले जाते. 

(डिस्क्लेमर  : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी