Simple Solution of Vastushastra : लग्न ठरण्यात पुन्हा-पुन्हा अडथळा येतो का? वास्तुशास्त्राचे सोपे उपाय केल्यावर होईल शुभमंगल

धर्म-कर्म-भविष्य
Updated Dec 06, 2021 | 09:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

विवाह योग्य मुला-मुलीच्या लग्नात विनाकारण उशीर होण्यासाठी किंवा वारंवार नात्यात वितुष्ट येण्यासाठी घरातील वास्तुदोष कारणीभूत असतात. काही उपाय केल्याने या समस्या दूर होतात.

 Does getting married get in the way again? Good luck with the simple solution of Vastushastra
लग्न ठरण्यात पुन्हा पुन्हा अडथळा येतो का? वास्तुशास्त्राचे सोपे उपाय केल्यावर होईल शुभमंगल।  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तू दोषांमुळे विवाहात अनावश्यक विलंब होतो
  • सर्व कारणांसोबत त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती आणि वास्तू देखील कारणीभूत
  • खोलीची दिशा आणि भिंतीचा योग्य रंग महत्त्वाची भूमिका बजावते

Simple Solution of Vastushastra :  मुंबई : लग्नाला (Marriage) उशीर होणे, लग्न मोडणे किंवा पती-पत्नीमध्ये वारंवार होणारी भांडणे. या अशा समस्या आहेत, ज्याच्या मागे इतर सर्व कारणांसोबत त्यांच्या कुंडलीतील (Horoscope) ग्रहस्थिती आणि वास्तू देखील कारणीभूत आहेत. या समस्यांची काळजी घेतल्यास चांगले परिणाम मिळतात. आज आपण वास्तुशास्त्रातील (Vastushastra) ते दोष आणि उपाय जाणून घेऊया जे वैवाहिक जीवनात अडथळा बनतात. (Does getting married get in the way again? Good luck with the simple solution of Vastushastra)

या वास्तू दोषांमुळे नुकसान 

  • घरातील वास्तुदोषांमुळे विवाहयोग्य मुला-मुलीच्या विवाहात विलंब होतो. त्याचबरोबर पती-पत्नीच्या नात्यातही दुरावा येतो. यासाठी काही सोपे उपाय करून या अडचणी दूर करता येतात.
  • घरातील मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल तर त्यांची खोली कोणत्या दिशेला असावी ते पहा. विवाहयोग्य मुला-मुलीची खोली नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला असावी. जर हे शक्य नसेल तर उत्तर दिशेला झोपणे देखील चांगले असते.
  • खोलीच्या दिशेशिवाय, त्यांचा पलंग भिंतीला चिकटलेला नाही हे देखील पहा. म्हणजेच, बेड दोन्ही बाजूंनी वापरता येईल अशाप्रकारे ठेवावा. त्याच्या खोलीच्या भिंतीवर रंगीबेरंगी फुलांचा फोटो लावणे देखील चांगले होईल.
  • विवाहित लोकांच्या लग्नाला उशीर होत असेल तर त्यांच्या खोलीच्या भिंतींवर हलका गुलाबी रंग वापरणे खूप शुभ आहे. गुलाबी रंगाचा वापर शक्य नसेल तर इतर कोणताही हलका रंगही वापरता येईल. पण चुकूनही भिंतींवर निळा, काळा किंवा राखाडी रंग वापरू नका.
  • मुला-मुलींच्या खोलीच्या भिंतीवर मँडरीन बदकांच्या जोडीचा फोटो लावणे किंवा त्याची कलाकृती ठेवणे खूप शुभ आहे. त्यामुळे त्यांचे लग्न लवकर होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी