मुंबई: Chandra Grahan Daan: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (lunar eclipse) 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (astrology) ग्रहणाची घटना अशुभ मानली जाते. या दरम्यान अनेक गोष्टी न करण्यास मनाई आहे. चंद्रग्रहण काळात, ग्रहण संपल्यानंतर, स्नान वगैरे केल्यानंतर काही गोष्टींचे दान केल्यास विशेष लाभ मिळतो. यामुळे नोकरीशी संबंधित समस्या आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होते.
ज्योतिष शास्त्रात पांढरे मोती हे चंद्राचे करक मानले जातात. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरीत यश मिळवू इच्छित असाल तर ग्रहणाच्या दिवशी तुम्ही पांढरे मोती किंवा त्यापासून बनवलेले दागिने एखाद्याला दान करू शकता.
अधिक वाचा- Raigad News: कोंबड्यांची झुंज लावून लावला सट्टा, फायटर कोंबडे ताब्यात
जर तुमच्या घरात कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर ग्रहणाच्या दिवशी काचेच्या भांड्यात पाणी टाकून त्यात चांदीचे नाणे टाकावे. आता आजारी व्यक्तीने त्या पाण्याच्या भांड्यात आपला चेहरा पाहावा आणि तो वाडगा नाण्यासोबत कोणाला तरी दान करावा.
चंद्राचा संबंध पांढर्या वस्तूंशी आहे. अशा स्थितीत चंद्रग्रहणाच्या काळात पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. ग्रहणानंतर पांढऱ्या रंगाची साखर किंवा कपडे दान केल्याने घरातील कलह दूर होतो असे म्हणतात. घरात आनंद येतो. यामुळे घरामध्ये शुभता येते आणि दुःख दूर होते.
चंद्रग्रहणानंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. आर्थिक संकटातून जात असलेल्या लोकांनी ग्रहणानंतर दूध आणि सफेद तांदूळ दान करावे. धार्मिक मान्यतेनुसार तांदूळ हे सुख आणि समृद्धीचे सूचक आहे. त्यांच्यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केल्यास किंवा या वस्तूंचे दान केल्यास भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
हिंदू धर्मात ग्रहणानंतर दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यामुळे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणानंतर काही वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. 8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण झाल्यानंतर कपडे, दूध आणि खेळणी इत्यादींचे दान करा. संतान सुख मिळवायचे असेल तर ग्रहणाच्या दिवशी दूध, कपडे किंवा खेळणी दान करा. फायदा होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi याची पुष्टी करत नाही.)