Friday Daan significace : मुंबई: हिंदू धर्मामध्ये दान करण्याला खूप महत्व आहे आणि दान करणं हे एक महत्वाचं काम असल्याचं बोललं जातं. त्यामुळे आपल्या ऐपतीनुसार प्रत्येक नागरिकांनी काही ना काही वस्तू नक्कीच दान करायला हवी जेणेकरुन त्याचा फायदा गरजवंतांना, गरिबांना होईल आणि त्यांचा गरजा पूर्ण होतील. तसेच दान केल्याने तुम्हालाही पुण्य लागेल.
आपल्या प्रत्येकाचीच काही ना काही इच्छा असते, स्वप्न असतात. आर्थिक समस्या ही एक अशी समस्या आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण होते आणि या समस्येमुळे इतरही समस्या निर्माण होतात. लक्ष्मी माता ही धनाची देवी आहे आणि त्यामुळेच लक्ष्मीची घरोघरी पूजा केली जाते. खासकरुन शुक्रवारी लक्ष्मीमातेची विशेष पूजा केली जाते.
दान करण्यासाठी तमच्याकडे रोख रक्कम असावी किंवा बाजारातून नवी वस्तू खरेदी केली पाहिजे. तर,तुम्ही तुमच्या घरातील एखादी जुनी वस्तूही दान करु शकतात. म्हणजेच तुमच्या घरात अशी काही वस्तू आहे ज्याचा तुम्हाला उपयोग नाहीये अशी वस्तू तुम्ही दुसऱ्यांना दान करुन त्यांच्या गरजा नक्कीच पूर्ण करु शकतात. अशा वस्तूंसोबतच शुक्रवारी अशाही वस्तू दान करा ज्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल. शुक्रवारी काही वस्तूंचं दान केल्यास त्याचा मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. पाहूयात कुठल्या आहेत या वस्तू ज्या शुक्रवारी तुम्ही दान करु शकतात.
(टीप: TimesNow Marathi गोष्टींचं समर्थन करत नाही. मात्र, अशा प्रकारे दान केल्यास त्याचा आपल्याला फायदा होतो अशी अनेकांची मान्यता आहे आणि आम्ही त्याचं केवळ वृत्तांकन करत आहोत.)