Wednesday Remedies: बुधवारी 'या' 2 गोष्टींचे करा दान, गणपती बाप्पा दूर करेल सर्व समस्या

Wednesday Remedies: ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी केलेले उपाय विशेष फलदायी असतात. कुंडलीत बुधाची स्थिती वाईट असेल तर या दिवशी काही गोष्टींचे दान करणे उत्तम.

Wednesday Remedies
बुधवारी 'या' 2 गोष्टींचे करा दान, गणपती बाप्पा करतील कृपा 
थोडं पण कामाचं
  • श्रीगणेश (Shri Ganesh) हे सर्व पूज्य देवतांपैकी पहिले मानले जातात. त्यांचे ध्यान केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
  • या दिवशी श्रीगणेशाचा (Lord Ganesh) आशीर्वाद मिळविण्यासाठी भाविक विविध उपाय करतात.
  • बुधवारी केलेल्या उपायांनी गणपती लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात, असा समज आहे.

मुंबई:  श्रीगणेश (Shri Ganesh) हे सर्व पूज्य देवतांपैकी पहिले मानले जातात. त्यांचे ध्यान केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. यामुळेच कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची विशेष पूजा केली जाते. बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. या दिवशी श्रीगणेशाचा (Lord Ganesh)  आशीर्वाद मिळविण्यासाठी भाविक विविध उपाय करतात. बुधवारी केलेल्या उपायांनी गणपती लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात, असा समज आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीने बुधवारी या 2 गोष्टींचे दान करावे. हे उपाय केल्याने नशीब चमकू लागते. जर एखाद्याच्या कुंडलीत बुधाची स्थिती खराब असेल तर बुधवारी या गोष्टींचे दान करणे उत्तम.

अधिक वाचा- Weight Loss: फक्त लिंबूच नाही तर लिंबाची साल देखील करते वजन कमी, केवळ असे करा सेवन

मूग डाळ

बुधवारी काही वस्तूंचे दान केल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते. मुगाच्या डाळीचे दान सर्वोत्तम असे म्हटले जाते. बुधवारी दीड किलो मूग डाळ दान केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांचे सर्व अडथळे दूर करतो. बुधवारी मुगाच्या डाळीत तूप आणि साखर मिसळून गायीला खाऊ घातल्यानं सर्व इच्छा पूर्ण होतात. या उपायाने बाप्पाची कृपा प्राप्त होते.

नपुंसकांना पैसे द्या

ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी काही नपुंसकांना पैसे आणि मेकअपच्या वस्तू दान कराव्यात. लक्षात ठेवा की हा उपाय तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा नपुंसकांना दान केल्यानंतर त्यांच्याकडून एक किंवा दोन रुपये काढून घ्या. यानंतर त्यांच्याकडून घेतलेले हे पैसे तुमच्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने कुंडलीत उपस्थित असलेला बुध ग्रह बलवान होतो. असे मानले जाते की, हे उपाय केल्याने धन आणि व्यवसायात प्रगती होते.


Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की Times Now Marathi कोणत्याही प्रकारच्या विश्वासाला, माहितीला दुजोरा देत नाही. कोणतीही माहिती किंवा गृहितक लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी