कोणत्याच बुधवारी विसरूनही करू नका 'ही' कामे; नाहीतर होईल आर्थिक नुकसान

आठवड्यातील सर्व दिवस आपण देवाच्या नावाने अर्पण केली आहेत. यात बुधवार हा दिवस भगवान गणेश जी समर्पित आहे.

Don't  do these things on any Wednesday
कोणत्याच बुधवारी विसरूनही करू नका ही कामे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बुधवारी गुंतवणूक करू नये.
  • कोणत्याही दिवशी कोणालाही अपमानास्पद शब्द बोलू नयेत.
  • ज्या मातांना मुली आहेत त्यांनी बुधवारी केस धुवू नयेत.

नवी दिल्ली : आठवड्यातील सर्व दिवस आपण देवाच्या नावाने अर्पण केली आहेत. यात बुधवार हा दिवस भगवान गणेश जी समर्पित आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली पाहिजे आणि नियमांचे पालन केले पाहिजे. ज्योतिषशास्त्रात, कोणते कामे बुधवारी करू नये याची माहिती दिली आहे. जर आपण चुकून या दिवशी व्रर्ज केलेली कामे केली तर आपल्याला पैशाच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. आर्थिक फटका बसू नये यासाठी काही नियम सांगण्यात आली आहेत. हे नियम कोणती आहेत, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत... 

कुठेच पैसे गुंतवू नका 

बुधवारी गुंतवणूक करू नये. अशा गुंतवणुकीमुळे नुकसान होते. तसेच या दिवशी कोणाशीही उधारीचा व्यवहार करू नये.  बुधवारी दिलेले कर्ज परत केले जात नाही आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना अनेक अडचणी येतात. 

काळे कपडे घालू नका 

बुधवारी काळे कपडे घालू नयेत. हे अत्यंत अशुभ आहे. विशेषतः महिलांनी काळे कपडे अजिबात घालू नयेत. 

वाईट शब्द बोलू नका

तसे, कोणत्याही दिवशी कोणालाही अपमानास्पद शब्द बोलू नयेत. पण विशेषतः बुधवारी हे अजिबात करू नये. आपली वाणी गोड असली तर आपले सर्व कामे पूर्ण होत असतात. 

प्रवास करू नका

बुधवारी पश्चिम दिशेने प्रवास करू नका. अशा प्रवासामुळे नुकसान होते.

मातांनी केस धुवू नये 

ज्या मातांना मुली आहेत त्यांनी बुधवारी केस धुवू नयेत. याचा त्याच्या मुलीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. (सर्व फोटो: सांकेतिक) 

(टीप: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. टाइम्स नाऊ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी