Raksha Bandhan 2022: भाऊ आणि बहिणीच्या असीम प्रेमाचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन (Raksha Bandhan) देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. यावेळी 11 आणि 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केला जात आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी (Rakhi) बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात. गुरुवारी सकाळी 09:34 वाजता श्रावण (Sharavan) महिन्याची पौर्णिमा सुरू होईल आणि 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07:18 वाजता संपेल. 11 ऑगस्ट रोजी पौर्णिमा तिथी सुरु झाल्यानंतर भद्रा कालावधी सुरू होईल. जो 11 ऑगस्ट रोजी रात्री 08:30 वाजता संपेल. त्यामुळे राखी बांधण्याचा मुहूर्त 11 तारखेला रात्री 8.51 ते 09:12 पर्यंतचा असेल.
ज्या बहिणी आपल्या भावाला स्वतः राखी बांधत आहेत, त्यांनी ही तारीख लक्षात ठेवावी. भद्रा काळात राखी बांधणे हे शुभ नाही. त्याचप्रमाणे ज्या बहिणी दूर राहतात आणि आपल्या भावासांठी त्या राखी पाठवतात पण काही कारणास्तव त्यांना रक्षाबंधनानंतर राखी मिळाल्यास भावांनी एक गोष्ट जरुर लक्षात ठेवावी. ती म्हणजे ज्यांना त्यांच्या बहिणींनी राखी पाठवली आहे, त्यांनी ती राखी आपली मुलगी किंवा आत्या अशांकडून बांधून घ्यावी. हवं असल्यास तुम्ही पुरोहिताकडून देखील राखी बांधून घेऊ शकतात.
रक्षाबंधनानंतर राखी बांधण्याची योग्य वेळ
रक्षाबंधन पार पडल्यानंतरही राखी बांधण्यासाठी दिवस आणि तारखेची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रतिपदा तिथी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येते आणि या दिवशी राखी बांधणे योग्य नाही. अशा स्थितीत पुढील आठवडा किंवा 15 दिवसात राखी बांधा. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राखी बांधावी असे म्हणतात. रात्री राखी बांधणे शुभ मानले जात नाही.
या मंत्राचा जप करा
राखी बांधताना लक्षात ठेवा की, तुमचा चेहरा पूर्व दिशेला असावा. तसेच या मंत्राचा जप करा - येन बद्धो बलि राजा,दानवेन्द्रो महाबल: । तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:।। या मंत्राचा जप केल्याने सर्व काही शुभ होते.
रक्षाबंधनाच्या थाळीमध्ये या गोष्टी जरूर करा सामील
रक्षाबंधन भावाला राखी बांधण्याआधी त्याची आरती ओवाळली जाते. जाणून घ्या पुजेच्या थाळीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा.