Janmashtami 2020: जाणून घ्या यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभमुहूर्त

धर्म-कर्म-भविष्य
Updated Aug 09, 2020 | 15:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

दरवर्षी भाद्रपदाच्या कृष्णपक्षातील अष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी (Krushna Janmashtami) साजरी केली जाते. या वर्षी हा सण 11-12 ऑगस्ट रोजी म्हणजे दोन दिवस साजरा करण्यात येणार आहे.

Krishna Jnmashtami 2020
कशी कराल कृष्णजन्माष्टमीची पूजा? 

थोडं पण कामाचं

  • कशी कराल कृष्णजन्माष्टमीची पूजा?
  • काय कराल आणि काय टाळाल या दिवशी?
  • काय आहे कृष्णजन्माष्टमीचे महत्व?

मुंबई: दरवर्षी भाद्रपदाच्या कृष्णपक्षातील अष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी (Krushna Janmashtami) साजरी केली जाते. या वर्षी हा सण 11-12 ऑगस्ट रोजी म्हणजे दोन दिवस साजरा करण्यात येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 12 तारखेचा दिवस जन्माष्टमी साजरी करणे अधिक शुभ आहे. जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. हिंदू मान्यतांनुसार भाद्रपदाच्या कृष्णपक्षातील अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला.

जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करण्यासोबतच लोक भजन-कीर्तन आणि साग्रसंगीत पूजाही करतात. पण याचे हवे ते फळ मिळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

पूजेची वेळ-

जन्माष्टमीच्या दिवशी अनेक लोक सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करतात. पण श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे ही वेळ पूजेसाठी शुभ मानली जाते.

स्वच्छ भांडी-

भगवान कृष्णाच्या पूजेसाठी साफ भांड्यांचाच वापर करावा. ही भांडी मांसाहार शिजवण्यासाठी वापरलेली नसावीत.

दिशा-

जन्माष्टमीदिवशीच्या देखाव्याची दिशा विशेष लक्षात घ्या. यासाठी आपण विशेषज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

प्रसाद-

भगवान श्रीकृष्णाला यादिवशी पंचामृताचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते.

काय करू नये?

जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला नवीन पोषाख घाला. अनेकदा दुकानदार जुनेच कपडे नवे म्हणून विकतात. त्यामुळे खरेदी करताना काळजी घ्या.

शुभमुहूर्त-

12 ऑगस्ट रोजी पूजेचा शुभमुहूर्त रात्री 12 वाजून 5 मिनिटे ते 12 वाजून 47 मिनिटे इतका आहे. पूजेचा अवधी 43 मिनिटांचा आहे.

जर आपल्या घराजवळ एखादं मंदिर नसेल तर आपण घरीच बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करा. यावेळी आपण एक छोटा पाळणाही आणू शकता. त्यानंतर रात्री बरोबर १२ वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेऊन यथासांग पूजा करावी. यावेळी आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील आमंत्रण द्या. 

यावेळी बाळकृष्णाच्या मूर्तीला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायला अजिबात विसरु नका. त्यासोबत मूर्तीला योग्य शृगांरही करावा. यावेळी विधीवत पूजा करावी. जर कृष्णासोबत राधेचीही प्रतिमा असेल तर राधेला लाल रंगाचं वस्त्र परिधान करावं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी