Tulsi Vivah Rangoli Designs 2021: तुलसी विवाहाला घरासमोर काढा सुंदर रांगोळी, या आहेत डिझाईन्स

धर्म-कर्म-भविष्य
Updated Nov 15, 2021 | 13:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tulsi Vivah Rangoli Designs 2021 Images, Pics, Photos: आज तुलसी विवाह आहे. याला देवउठनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. या खास क्षणानिमित्त आपल्या घराच्या अंगणात सुंदर रांगोळी काढा. 

tulsi vivah
Tulsi Vivah Rangoli Designs: तुलसी विवाहाला काढा ही रांगोळी 
थोडं पण कामाचं
  • आज तुलसी विवाह ज्याला देवउठनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. 
  • या दिवसापासून लग्नसोहळ्यांना सुरूवात होते
  • आजच्या दिवशी काढा सुंदर रांगोळी

मुंबई: आज तुलसी विवाह(tulsi vivah) आहे ज्याला देवउठनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. हिंदू धर्मात(hindu religion) तुलसी विवाहाला विशेष महत्त्व आहे. हा सण खूपच श्रद्धेने आणि धूमधामने साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू(lord vishnu) निद्रेतून उठतात आणि त्यानंतर तुलसीचा विवाह शालिग्रामशी केला जातो. या दिवसापासून लग्न सोहळ्यांना सुरूवात होते. तुलसी विवाहाच्या शुभ दिनी तुळशीच्या झाडाकडे रांगोळी(rangoli) काढणे खूप शुभ मानले जाते. draw this beautiful rangoli on tulsi vivah

अशी मान्यता आहे की रांगोळी काढल्याने देवी देवता प्रसन्न होतात. या दिवशी तुळशी मातेला नवरीप्रमाणे सजवले जाते. त्यानंतर तिचे लग्न शालिग्रामशी लावले जाते.आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत अंगणात काढण्यासारख्या तुलसी विवाहासारख्या रांगोळ्या. 

तुलसी विवाहाचा दिवस खूपच शुभ मानला जातो. हिंदू धर्मानुसार तुलसी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू मोठ्या निद्रेतून जागे झाले होते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केल्याने ते पूर्ण होते. तुलसी विवाहाच्या दिवशी सर्व महिला सकाळी-सकाळी उठून तुलसी मातेची पूजा-अर्चना करतात. तुलसी मातेला या दिवशी सजवले जाते. 

तुलसी माता पूर्वजन्मात वृंदा नावाने ओळखली जात होती. या दिवशी श्री हरी यांच्या शालिग्राम या रुपाशी तुलसीचा विवाह केला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी