Dutt Jayanti 2021 : यंदा १८ डिसेंबरला दत्त जयंती, जाणून घ्या मार्गशीर्ष पौर्णिमेची कथा, तिथी आणि वेळ

Dutt Jayanti 2021 : भगवान दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान शंकर यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे दत्तात्रेयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन शक्तीची उपसना असं मानलं जातं.

(Dutt Jayanti 2021: This year Datt Jayanti on 18th December, find out the date and time of Margashirsha Purnima)
Dutt Jayanti 2021 : यंदा १८ डिसेंबरला दत्त जयंती, जाणून घ्या मार्गशीर्ष पौर्णिमेची कथा, तिथी आणि वेळ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला.
  • भगवान विष्णूच्या 24 अवतारांमधील सहावा अवतार मानला जातो.
  • दत्तात्रेय हा योग व तंत्रमार्गातील आचार्य वा योगीराज मानला जातो.

Dutt Jayanti 2021 : हिंदू धर्मामध्ये दत्त जयंती (Datta Jayanti) हा मार्गशीर्ष महिन्यातील (Margashirsha) एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रभरात दत्त जयंती निमित्त भाविक दत्त मंदिरामध्ये मोठी गर्दी करतात. औदुंबर हे दत्ताचे आवडते वृक्ष असल्याने त्याच्या सान्निध्यामध्ये या दिवशी गुरू चरित्राचे पारायण करण्याची प्रथा आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय (Dattatray) यांचा जन्म झाला. म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा १८ डिसेंबर शनिवारी दत्त जयंती साजरी होणार आहे. तर जाणून घेऊया दत्त जयंतीचे महत्व. (Dutt Jayanti 2021: This year Datt Jayanti on 18th December, find out the date and time of Margashirsha Purnima)

विष्णूच्या 24 अवतारांमधील सहावा अवतार

भगवान दत्तात्रेयाविषयी नाथ, महानुभाव व वारकरी या संप्रदायांत नितान्त आदर व श्रद्धाभाव आहे. भगवान दत्तात्रेय हे भगवान विष्णूच्या 24 अवतारांमधील सहावा अवतार मानला जातो. दत्तात्रेय असाच एक अवतार आहे, ज्यांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले. महाराज दत्तात्रेय आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे.

तीन शक्तीची उपसना

अनसूयेस अत्री ऋषीपासून भगवान दत्तात्रेयचा जन्म झाला असे सांगतात. भगवान दत्तात्रय हे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जातात. त्यामुळे दत्त जयंतीला या त्रिमूर्तींची पूजा केली जाते. भगवान दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान शंकर यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे दत्तात्रेयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन शक्तीची उपसना असं मानलं जातं.

दत्त जयंती तिथी वेळ, तारीख

 १८ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेची सुरूवात सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर १९ डिसेंबर सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी मार्गशीर्ष पौर्णिमा संपणार आहे. दत्त भक्त या वेळेत दत्त जयंती साजरी करू शकतात.

पौराणिक कथा

पार्वती, लक्ष्मी आणि सावित्री या तिन्ही देवींचा अभिमान दूर करण्यासाठी नारद मुनी त्यांच्याकडे गेले आणि तेथे अनुसूया देवीच्या पुण्यधर्माची स्तुती करू लागले. अनुसूयाचा तिन्ही देवींना मत्सर वाटू लागला आणि त्यांनी ऋषी अत्रींची पत्नी अनुसूया देवीची पवित्रता खराब करण्यासाठी त्यांच्या पतींना पाठवले. आपल्या पत्नींच्या आग्रहापुढे बळजबरीने ब्रह्मा, विष्णू आणि महेश भिक्षूकाचे रूप धारण करून अनुसूया देवीच्या कुटीसमोर भिक्षा मागण्यासाठी गेले. भिक्षा मिळाल्यानंतर त्यांनी अनुसूयाकडे भोजनाची इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर अनुसूया देवीने या देवतांचा सत्कार केला आणि ताटात अन्नदान करू लागली. पण देवांनी सांगितले की, जोपर्यंत तुम्ही निवस्त्र होऊन भोजन वाढले तरच आम्ही खाणार. हे ऐकून अनुसूया देवीला राग पण त्यांनी आपल्या सद्गुणधर्माच्या बळावर तिघांचेही हेतू जाणून घेतला. अनुसूया देवीने अत्रि ऋषींच्या पायाचे पाणी तिन्ही भिक्षूकांच्या अंगावर शिंपडले तेव्हा देवतांनी बालकाचे रूप धारण केले. मग देवीने तिघांनाही दूध पाजून त्यांचे पालनपोषण सुरू केले.

अनेक दिवस देवता घरी न आल्याने तिन्ही देवींना काळजी वाटू लागली. त्या अनुसयाच्या कुठीत आल्या. तेव्हा देवीने माता अनुसूयाकडे क्षमा मागितली. आई अनुसूया म्हणाली की त्यांनी माझे दूध प्यायले आहे आणि हे आता बालस्वरूपात राहतील. त्यानंतर तिन्ही देवांनी आपापले भाग एकत्र करून मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांची निर्मिती केली. त्यानंतर माता अनुसूयाने तिन्ही देवतांवर पाणी शिंपडले आणि त्यांना पूर्ण रूप दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी