Vat Savitri Vrat 2022: वट सावित्रेच्या व्रतावेळी या गोष्टींची घ्या काळजी, पूजा संपल्यानंतर या फळांचे करा सेवन 

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jun 13, 2022 | 19:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vat Savitri Vrat 2022 । हिंदू संस्कृतीमध्ये वट सावित्रीला खूप महत्त्व आहे, याला वट पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. वट सावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमावस्येला केले जाते.

Eat this fruit on the day of Vat Savitri
वट सावित्रेच्या व्रतावेळी या गोष्टींची घ्या काळजी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू संस्कृतीमध्ये वट सावित्रीला खूप महत्त्व आहे.
  • याला वट पौर्णिमा असे देखील म्हटले जाते.
  • यंदा वट सावित्रीचे व्रत सोमवारी ३० मे रोजी केले जाणार आहे.

Vat Savitri Vrat 2022 । मुंबई : हिंदू संस्कृतीमध्ये वट सावित्रीला खूप महत्त्व आहे, याला वट पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. वट सावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमावस्येला केले जाते. यंदा वट सावित्रीचे व्रत सोमवारी ३० मे रोजी केले जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात. वट सावित्रीच्या व्रतादिवशी वटवृक्षाला खूप महत्त्व असते. या दिवशी विवाहित स्त्रिया विधीनुसार वटवृक्षाची पूजा करतात. शास्त्रानुसार वटवृक्षाची पूजा केल्याने दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. (Eat this fruit on the day of Vat Savitri). 

अधिक वाचा : जाणून घ्या IPL प्लेऑफमध्ये कधी, कोण, कोणाशी भिडणार

पौराणिक मान्यतांनुसार या दिवशी सावित्रीने यमराजाकडे पती सत्यवानाचा जीव परत मागितला होता. तेव्हापासून विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्रीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया सोळा शृंगार करतात आणि वटवृक्षाला १२ किंवा १०८ वेळा प्रदक्षिणा घालतात. चला तर म जाणून घेऊया वट सावित्रीशी संबंधित काही खास गोष्टी.

अधिक वाचा : मुंबईच्या विजयात नाहून गेले RCB चे खेळाडू, पाहा फोटो

वटसावित्रीच्या दिवशी काय खावे

वट सावित्रीच्या दिवशी चण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ११ आणि २१ ग्रॅम चणे भिजवून न चावता खावे. वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून आंबा, हरभरा, पुरी, टरबूज यांचे सेवन करावे आणि पूजा करताना या सर्व गोष्टी वटवृक्षाला अर्पण कराव्यात.

खरबुजाचे करा सेवन 

वट सावित्रीच्या व्रतादिवशी खरबुजाचे सेवन करावे, कारण वट सावित्री व्रतामध्ये खरबुजाचे खूप महत्त्व आहे. पूजा संपल्यानंतर उपवास करणाऱ्या महिलांनी खरबुजाचे सेवन करावे.

आंब्याचा मुरंबा

वट सावित्री व्रतामध्ये आंब्याचा मुरंबाही खावा. आंबा मुरंबा बनवण्यासाठी आंबा, साखर किंवा गूळ वापरता येतो. कच्चा आंबा उकळून त्याचा मुरंबा तयार करायचा आहे, तो पूजेनंतर खाऊ शकतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी