Mole Meaning: या भागावर तीळ असलेली व्यक्ती खूप बुद्धीवान; जाणून घ्या विविध ५ भागांवरील तीळ काय देतात संकेत

धर्म-कर्म-भविष्य
Updated May 18, 2022 | 09:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mole Meaning In Marathi | लोकांच्या शरीराच्या अनेक भागात तीळ असतात. काही लोकांना असे वाटते की शरीरात तीळ असल्यास शरीराचे सौंदर्य कमी होते.

Find out what the 5 different parts of the mole give hints 
जाणून घ्या विविध ५ भागांवरील तीळ काय देतात संकेत  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लोकांच्या शरीराच्या अनेक भागात तीळ असतात.
  • काही लोकांना असे वाटते की शरीरात तीळ असल्यास शरीराचे सौंदर्य कमी होते.
  • ज्या लोकांच्या अंगठ्यावर तीळ असतो ते खूप हुशार आणि बुद्धीवान असतात.

Mole Meaning In Marathi | मुंबई : लोकांच्या शरीराच्या अनेक भागात तीळ असतात. काही लोकांना असे वाटते की शरीरात तीळ असल्यास शरीराचे सौंदर्य कमी होते. तसेच अनेक लोक याला नशिबाशी जोडतात कारण अनेक ठिकाणी तीळ असणे खूप चांगले मानले जाते, चला तर मग जाणून घेऊया शरीराच्या पाच ठिकाणी तीळ असणे म्हणजे काय? ते तुमच्यासाठी चांगले आहे की वाईट. (Find out what the 5 different parts of the mole give hints). 

अधिक वाचा : पुढच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा डेब्यू निश्चित

अंगठ्यावर तीळ 

ज्या लोकांच्या अंगठ्यावर तीळ असतो ते खूप हुशार आणि बुद्धीवान असतात. एकूणच अंगठ्यावर तीळ असणे म्हणजे चांगले आहे. 

तर्जनीवरील तीळ 

अंगठा आणि मधले बोट यांच्यामध्ये असलेल्या बोटाला तर्जनी असे म्हणतात. ज्या व्यक्तीच्या तर्जनीवर तीळ असतो तो अथवा ती व्यक्ती खूप हुशार असते. तसेच त्याच्याकडे भरपूर पैसा असतो, पण त्याच्या आजूबाजूचे लोक त्याचे शत्रू असतात. त्यामुळे अशा लोकांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे.

ओठांवर तीळ 

जर ओठाच्या अगदी वर उजव्या बाजूला तीळ असेल तर याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती त्याच्या कामात चांगली आहे, असे लोक खूप हुशार देखील असतात. तर ज्या लोकांच्या ओठाच्या डाव्या बाजूला तीळ असतो ते खूप कमकुवत असतात आणि त्यांना त्यांच्या लैंगिकतेमुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

डाव्या गालावर तीळ

ज्या व्यक्तीच्या डाव्या गालावर तीळ असतो, त्याचे मन अतिशय तीक्ष्ण असते. त्यांना आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे. असे लोक वेळोवेळी काहीतरी वेगळे करत राहतात.

डोळ्यावर तीळ 

ज्या लोकांच्या सरळ डोळ्यांवर तीळ असतो, ते खूप नाजूक असतात. प्रेमाच्या बाबतीत ते भावूकही होतात. असे लोक इतरांना मदत करून जीवनाचा आनंद लुटतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी