Chanakya Niti: चाणक्याच्या या नीतिचा जीवनात करा अवलंब कधीही मिळणार नाही अपयश, मिळेल श्रीमंती

चाणक्याने आपल्या नीतिमध्ये मानवी जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांचे नीतिशास्त्र हे त्या काळी जितके प्रभावी ती तितकीच समरुप आहे. जो कोणी व्यक्ती चाणक्यांच्या या नीतिचा अवलंब करतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होत असतो. चाणक्यांनी आपल्या नीतिमध्ये सांगितलं की, कोणत्या व्यक्तींना त्यांच्या जीवनात अपयश येतं आणि कोणत्या लोकांना यश मिळतं.

Chanakya Niti For Wealth
चाणक्याच्या या नीतिचा जीवनात करा अवलंब मिळेल श्रीमंती   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चाणक्याने आपल्या नीतिमध्ये मानवी जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
  • लोकांनी जीवनातील अपयशांना कधीही घाबरू नये.
  • माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचे अज्ञान आहे.

Chanakya Niti For Wealth:  आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी त्यांच्या नीतिशास्त्र ग्रंथात जीवनाशी संबंधित अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य यांची समज आणि दूरदृष्टी यावरुन ओळखता येते की त्यांनी शतकांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या युगातही प्रासंगिक आहेत. चाणक्यांनी आपल्या नीतिमध्ये यश मिळवण्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य  यांच्या  चाणक्य नीतिमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. (Follow this principle of Chanakya in life, you will never fail,  will get wealth)

चाणक्याने आपल्या नीतिमध्ये मानवी जीवनाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांचे नीतिशास्त्र हे त्या काळी जितके प्रभावी ती तितकीच समरुप आहे. जो कोणी व्यक्ती चाणक्यांच्या या नीतिचा अवलंब करतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होत असतो. चाणक्यांनी आपल्या नीतिमध्ये सांगितलं की, कोणत्या व्यक्तींना त्यांच्या जीवनात अपयश येतं आणि कोणत्या लोकांना यश मिळतं. चाणक्यच्या मते, लोकांनी जीवनातील अपयशांना कधीही घाबरू नये. एखाद्या व्यक्तीने अपयशातून शिकून आपल्या आयुष्यात पुढे जावे. जे अपयशाला घाबरत नाहीत, ते लोक आपल्या आयुष्यात निश्चित यश मिळवतात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला चाणक्याच्या अशा काही नीतिबद्दल सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून गरीबातील गरीब व्यक्तीही श्रीमंत होऊ शकतो.

ज्ञान

चाणक्य आपल्या नीतिमध्ये म्हणतात की, माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचे अज्ञान आहे.  यश आणि श्रीमंती हवी असेल तर व्यक्तीने आपल्या जीवनात ज्ञानाचा दिवा कायम जळता ठेवला पाहिजे. सर्व दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी ज्ञान उपयुक्त आहे. यामुळे यशाचा नवा मार्ग मिळतो.

दान

आचार्य चाणक्यांनी दानाविषयी आपलं मत मांडलं आहे. चाणक्य म्हणतात की, तुमचे उत्पन्न कितीही असले तरी त्यातील काही भाग दान आणि सत्कर्मासाठी वापरला पाहिजे. असे केल्याने गरिबी नष्ट होते आणि माणूस यशाची शिडी चढू लागतो.

धर्म ग्रंथ

आचार्य चाणक्यांनुसार,  पौराणिक काळापासून अनेक धार्मिक ग्रंथ मानवाकडे आहेत. या ग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे दु:ख दूर करण्याचे उपाय आणि ज्ञानात वृद्धी कशी करता येईल याविषयी लिहिण्यात आले आहे. यामुळे धार्मिक ग्रंथ वाचलेच पाहिजेत. यामध्ये दिलेले विचार आपले अंतकरण शुध्दीकरण करतात, तसेच जीवनातील सततच्या दु:खांचा अंत होण्यासही पुष्कळ प्रमाणात उपयुक्त ठरतात.

प्रामाणिकपणा

चाणक्य नीतीनुसार, वेळ किंवा परिस्थिती कशीही असो, व्यक्तीने नेहमी प्रामाणिकपणाचा मार्ग अवलंबला पाहिजे. जे लोक आपले काम प्रामाणिकपणे करतात आणि कोणाचीही फसवणूक करत नाहीत, त्यांच्यावर लक्ष्मी माता  प्रसन्न होते आणि सदैव आपली कृपा ठेवते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी