June Horoscope 2022 : नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रात (Astrology)सूर्यदेवाला विशेष स्थान आहे. सूर्य देवाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात. जेव्हा सूर्य शुभ असतो तेव्हा व्यक्ती भाग्यवान ठरते. यावेळी सूर्य देव वृषभ राशीत बसला आहे. सूर्य दर महिन्याला राशी (Sun Transit)बदलतो. ज्योतिषीय गणनेनुसार, सूर्य मेष राशीत राहून काही राशींवर विशेष कृपा करत आहे. 14 जूनपर्यंत सूर्य वृषभ राशीत राहील. यानंतर सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. जाणून घेऊया वृषभ राशीत राहून सूर्य कोणत्या राशीवर विशेष अनुकूल आहे. (For these zodiac signs upto 14th June is golden time)
अधिक वाचा : शनिदेव उघडणार 'या' राशींच्या नशिबाचे दार
अधिक वाचा : Zodiac sign: या राशीच्या मुलींसाठी सोपे नाही पती आणि सासरच्यांना खुश ठेवणे...तुमची रास यात नाही ना?
अधिक वाचा : Horoscope Today 03 June 2022: मेष राशीच्या लोकांसाठी हे दोन रंग शुभ, मिथुन राशीचे आरोग्य राहील उत्तम
जून महिना ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा असणार आहे. याचे कारण म्हणजे जून महिन्यात पाच महत्त्वाचे ग्रह स्थान बदलणार आहेत. यादरम्यान तीन महत्त्वाच्या ग्रहांचे संक्रमण होईल, तर दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीमध्ये परिवर्तन होईल. त्यामुळे देशातील आणि जगातील सर्वच लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. यादरम्यान दोन महत्त्वाच्या ग्रहांचा शुभ योगायोगही तयार होत आहे, त्यामुळे त्याचाही परिणाम जाणवणार आहे. जून महिन्यात बुध आणि शुक्र या ग्रहांची युतीही होत आहे. खरं तर एप्रिल महिन्यापासून बुध वृषभ राशीत विराजमान आहे आणि आता या राशीत शुक्र ग्रहाच्या प्रवेशामुळे बुध-शुक्र यांची युती तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध-शुक्र संयोगाने लक्ष्मी नारायण योग तयार होतो आणि या योगाला अतिशय शुभ योगाचा दर्जा देण्यात आला आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)