Ganesh Chaturthi 2022: यंदा गणेश चतुर्थीला करा 'या' स्तोत्राचे पठण; सर्व दुःख होतील दूर, अशी करा सुरूवात

Ganesh Chaturthi 2022 Ganesh Stotra: गौरीपुत्र गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात.

Ganesh Chaturthi 2022
गणेश चतुर्थी 
थोडं पण कामाचं
  • 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे.
  • गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे.
  • श्री गणेशाला (Shri Ganesha) विघ्नहर्ता, (Vighnaharta)विद्यादत्त आणि मंगलकारी म्हणतात.

मुंबई: Ganesh Chaturthi 2022 Ganesh Stotra: 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. गणेशोत्सवाचा (Ganeshotsav)  उत्साह देशभरात पाहायला मिळत आहे. श्री गणेशाला (Shri Ganesha) विघ्नहर्ता, (Vighnaharta)विद्यादत्त आणि मंगलकारी म्हणतात. गौरीपुत्र गणपतीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे दूर होतात. गणेश चतुर्थीचा (Lord Ganesha) दिवस श्रीगणेशाच्या पूजेसाठी (worship) अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 

यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्ट 2022 ला. त्यानंतर पुढील 10 दिवस गणेशोत्सव असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये गणेश स्तोत्राचे पठण अवश्य करावे. हे तुम्हाला सर्व वेदना आणि दुःखांपासून मुक्त करते. गणेश स्तोत्राबद्दल नारद पुराणात सांगण्यात आलं आहे की, देवर्षी नारदजींनी हे स्तोत्र पहिल्यांदा पाठ केले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि सौभाग्य देणार्‍या गणपतीच्या पूजेमध्ये या स्रोताचा अवश्य पाठ करा. गणेश स्तोत्र ग्रंथ आणि त्यासंबंधीचे नियम जाणून घ्या.

अधिक वाचा-  भारतात आज होणार सर्वात मोठा धमाका, 9 सेकंदात पत्त्यासारखी कोसळणार गगनचुंबी इमारत

गणेश स्त्रोत पाठ

प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् ।
भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये ॥1॥

प्रथमं वक्रतुडं च एकदंत द्वितीयकम् ।
तृतियं कृष्णपिंगात्क्षं गजववत्रं चतुर्थकम् ॥2॥

लंबोदरं पंचम च पष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥3॥

नवमं भाल चंद्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानन् ॥4॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंघ्यंयः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥5॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मो क्षार्थी लभते गतिम् ॥6॥

जपेद्णपतिस्तोत्रं षडिभर्मासैः फलं लभते ।
संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः ॥7॥

अष्टभ्यो ब्राह्मणे भ्यश्र्च लिखित्वा फलं लभते ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥8॥

॥ इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम् ॥

या पद्धतीने गणेश स्तोत्राचा पठण करा

गणेश स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. तसेच पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे आणि गणेशासाठी आसन तयार करा. त्या आसनावर पिवळ्या रंगाचे कापड पसरवा. त्यावर गणेशाची मूर्ती बसवावी. यानंतर लाल फुले, अक्षता, चंदन, धूप, दिवा, फळे, मोदक, लाडू, पान, सुपारी आणि दुर्वा इत्यादी अर्पण करा. त्यानंतरच गणेश स्रोताचे पठण सुरू करा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 5, 7, 11 किंवा 108 वेळा या स्तोत्राचा पाठ करू शकता. पाठाचा उच्चार बरोबर करा आणि पाठ संपल्यानंतर गणपतीची आरती करा.

(अस्वीकरण: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी