Ganesh Chaturthi 2022 : बुधवारी ३१ऑगस्ट रोजी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. गणपती येणार म्हणून सर्व गणेश भक्तींची लगबग सुरू होणार आहे. गणपती येणार म्हणून लहान मुलेही खुश आहेत. कुठलेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पुजा केली जाते. परंतु तुम्ही पाहिले असेल उजव्या सोंडेचा गणपती आणि डाव्या सोंडेचा गणपती. गणपतीच्या उजव्या सोंडेवर चंद्राचा प्रभाव असतो. तर डाव्या सोंडेवर सुर्याचा प्रभाव असतो. जाणून घेऊया घरी कुठल्या सोंडेचा गणपती आणावा आणि कशा प्रकारे गणपतीची पुजा करावी. (ganesh chaturthi 2022 which position ganesh idol bring at home news in marathi)
Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीच्या दिवशी उंदीर दिसला, मग या संकेतांकडे नका करू दुर्लक्ष
डाव्या सोंडेच्या गणपतीमुळे घरात सुख शांती येते आणि घर समृद्ध होतं. तसेच डाव्या सोंडेच्या गणपतीमुळे शिक्षण, व्यवयास आणि कौटुंबिक यश मिळतं. म्हणून घरात डाव्या सोंडेच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा करावी. डाव्या सोंडेच्या गणपतीमुळे घरात सकारात्मकता वाढते आणि वास्तू दोष दूर होते. इतकेच नाही तर डाव्या सोंडेच्या गणपतीची पुजा करताना काही चुका झाल्यास गणपती माफ करतो.
उजव्या सोंडेचा गणपती हा दक्षिणाभिमुख गणपतीही म्हटला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हटले जाते. उजव्या सोंडेच्या गणपतीची पुजा अतिशय कडक असते. संपूर्ण विधीनुसार या गणपतीची पुजा करावी लागते. इतकेच नाही तर उजव्या सोंडेच्या गणपतीची विधिवत पुजा न झाल्यास या गणपतीचा कोप होतो. उजव्या सोंडेच्या गणपतीची पुजा मंदिरात किंवा विशेष ठिकाणी होते. तसेच या गणपतीची स्थापना आणि पुजा पुरोहितांच्याच हस्ते होते. उजव्या सोंडेच्या गणपतीच्या दर्शनाने सर्व कार्य सफल होतात. असे असले तरी घरी उजव्या सोंडेचा गणपती बसवू नये.
(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आलेली आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)