Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सवाला (Ganesh Festival 2022) जसं सार्वजनिक उत्सव म्हणून मोठं महत्त्व आहे. मंडळांप्रमाणेच घरोघरी गणपत्ती बाप्पांचं आगमन होतं आणि पुढचे दहा दिवस चैतन्याने, उत्साहाने आणि आनंदाने भरून जात असतात. बुद्धी आणि सिद्धी प्राप्त करून देणारा उत्सव म्हणूनही गणेशोत्सवाकडे पाहिलं जातं. दरवर्षी गणेशोत्सव तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. मात्र यंदाचा गणेशोत्सव आणखी वेगळा आणि खास आहे. यंदा तब्बल 300 वर्षांनंतर (300 years) एक अद्बूत योगायोग (Coincidence) जुळून आला आहे.
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार आजच्या दिवशी बरोबर अशी स्थिती जुळून आली आहे जी गणपतीच्या जन्मावेळी होती. एका आख्यायिकेनुसार पावर्ती देवीने मातीपासून मूर्ती तयार करून त्यात प्राण फुंकले होते. पार्वती देवीने हा चमत्कार केला तो दिवसही बुधवारचाच होता. त्या दिवशी चतुर्थी होती आणि चित्रा नक्षत्रही होते. या वर्षीदेखील नेमकी हीच सगळी स्थिती जुळून आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव खास मानला जात आहे. यावेळी गुरु ग्रहाच्या स्थितीचा विचार करता लंबोदर योग जुळून येत असल्याचं सांगितलं जात आहे. लंबोदर हे गणपतीचंच एक नाव आहे. त्याचप्रमाणे वीणा, वरिष्ठ, उभयचरी आणि अमला हे राजयोगदेखील आजच्या दिवशी निर्माण होत आहेत.
यंदा 31 ऑगस्टपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. हे दहाही दिवस गणपत्ती बाप्पा आपल्या भक्तांसोबत राहणार आहेत. ग्रहांच्या स्थितीचा विचार केला तर आणखी एक योगही या वर्षी जुळून येत असल्याचं दिसून आलं आहे. या वर्षी चार प्रमुख ग्रह आपापल्या राशीत विराजमान असणार आहेत. सूर्य सिंह राशीत, बुध कन्या राशीत, गुरु मीन राशीत आणि शनी मकर राशीत असणार आहे. गणेश चतुर्थीला ग्रहांनी अशा प्रकारे आपापल्या राशीत विराजमान असण्याचा योगही तब्बल 300 वर्षांनी आला आहे.
अधिक वाचा - Ganesh Chaturthi 2022 : म्हणून गणपतीची झाली दोन लग्न, वाचा गणेश विवाहाची ही पौराणिक कथा
गणपतीची पूजा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पूजा करण्याची विशिष्ट अशी कुठलीही पद्धत नसून प्रत्येकाने मनोभावे आपापल्या पद्धतीने गणपतीची पूजा करून त्याची प्रार्थना करावी, असं सांगितलं जात आहे. गणेश चतुर्थीला अनेकजण आपल्या घरी बाप्पाची मूर्ती घेऊन येतात आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करतात. गणपतीला लाल रंगाची फुलं आवडतात आणि मोदकांचा नैवेद्य प्रिय असतो, असं सांगितलं जातं. प्रत्येकाने या दहा दिवसात गणपती बाप्पाचं मनोभावे पूजन करावं आणि मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला जातो.