Ganesh Chaturthi 2022 : म्हणून गणपतीची झाली दोन लग्न, वाचा गणेश विवाहाची ही पौराणिक कथा

प्रत्येक शुभकार्यापूर्वी गणपतीची पुजा केली जाते. लग्न असो वा कुठलेही मंगल कार्य त्यापूर्वी गणपतीची पुजा केली जाते. गणपतीची पुजा केल्यामुळे काम निर्विघ्नपणे पार पडते असे सांगितले जाते. उद्या गणेश चतुर्थी असून घराघरांत गणपती विराजमान होणार आहे. लाडके गणपती बाप्पा येणार म्हणून लहान मुलांसह मोठी माणसेही उत्साहात आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया गणपतीची दोन लग्न का झाली होती. वाचा गणेश विवाहाची ही पौराणिक कथा.

riddhi siddhi ganpati marriage
रिद्धी सिद्धी गणपती विवाह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक शुभकार्यापूर्वी गणपतीची पुजा केली जाते.
  • लग्न असो वा कुठलेही मंगल कार्य त्यापूर्वी गणपतीची पुजा केली जाते.
  • गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया गणपतीची दोन लग्न का झाली होती.

Ganesh Vivah Story  : प्रत्येक शुभकार्यापूर्वी गणपतीची पुजा केली जाते. लग्न असो वा कुठलेही मंगल कार्य त्यापूर्वी गणपतीची पुजा केली जाते. गणपतीची पुजा केल्यामुळे काम निर्विघ्नपणे पार पडते असे सांगितले जाते. उद्या गणेश चतुर्थी असून घराघरांत गणपती विराजमान होणार आहे. लाडके गणपती बाप्पा येणार म्हणून लहान मुलांसह मोठी माणसेही उत्साहात आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घेऊया गणपतीची दोन लग्न का झाली होती. वाचा गणेश विवाहाची ही पौराणिक कथा. (ganesh chaturthi ganesh vivah with riddhi and siddhi read story in marathi)

Happy Ganesh Chaturthi HD Wishes in marathi : गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून द्या शुभेच्छापत्र

एकदा गणपती तपस्या करत होते, तेव्हा बाजूने तुळशी जात होती. गणपतीला पाहून तुळशी त्याच्या प्रेमात पडली. आणि गणपतीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु आपण ब्रह्मचारी आहोत आणि कधीच लग्न करणार नसल्याचे सांगून तुळशीचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे तुळशी रागावली आणि तुझे एक काय दोन दोन लग्न होतील असा गणपतीला शाप दिला. 

Happy Ganesh Chaturthi in Marathi Wishes : गणेश चतुर्थीनिमित्त Facebook, Instagram WhatsApp, Twitter आणि Social media वर मराठीतून द्या शुभेच्छा

आणखी एका पौराणिक कथेनुसार गणपतीच्या शरीरयष्टीमुळे तसेच हत्तीच्या चेहर्‍यामुळे त्याच्याशी कोणी लग्न करायला तयार नव्हते. त्यामुळे गणपती नाराज झाला आणि इतर देवांच्या लग्नात अडथळे आणू लागला. तेव्हा सर्व देव चिंतीत झाले आणि ब्रह्मदेवाकडे हा प्रश्न सोडवण्यासाठी गेले. ही समस्या सोडवण्यासाठी ब्रह्मदेवाने एक शक्कल लढवली. ब्रह्मदेवाला रिद्धी आणि सिद्धी अशा दोन मानसकन्या होत्या. या दोन्ही मानसकन्यांना ब्रम्हदेवाने गणपतीकडे शिक्षण घेण्यासाठी पाठवले. ब्रह्मदेवाचा आदेश म्हणून गणपतीने रिद्धी आणि सिद्धीला शिकवण्यास सुरूवात केली. 

Ganesh Chaturthi 2022 : डाव्या सोंडेची की उजव्या सोंडेची? गणेश चतुर्थीला गणपतीची कुठल्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करावी ?

त्यानंतर जेव्हा जेव्हा कुठे देवाचे लग्न होत असेल आणि त्याची माहिती गणपतीला मिळत असे तेव्हा रिद्धी आणि सिध्दी गणपतीचे लक्ष विचलित करत, त्यामुळे त्या देवाचा विवाह निर्विघ्नपणे पार पडत असे. काही वेळानंतर गणापतीच्या लक्षात आले की काही देवांचे लग्न झाले आहे. तेव्हा गणपती रिद्धी आणि सिद्धीवर चिडले. गणपती रिद्धी आणि सिद्धीला शाप देणार तेवढ्यात ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी गणपतीला रिद्धी सिद्धीसोबत लग्न करण्यास सांगितले. गणपतीने ब्रह्मदेवाचे ऐकले आणि रिद्धी सिद्धीसोबत लग्न केले. 

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

Ganesh Chaturthi 2022 Flowers: गणपतीला बाप्पाला दररोज अर्पण करा 'हे' फूल अन् पाहा चमत्कार


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी