Ganesh ji Puja Rules: हिंदू धर्मानुसार (Hinduism) आठवड्यातील सात दिवस वेगवेगळ्या देवांसाठी असतात. बुधवार हा गणपतीचा (Ganesha) दिवस असतो. बाप्पाला विघ्नहर्ता या नावांनी ओळखले जाते. हिंदू धर्मात गणेशपूजेला (Ganesha Puja) विशेष महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजेने होते. असं म्हटलं जातं की, गणपतीची पूजा केल्याने माणसाचे सर्व मोठे संकट टळत असतात. जे लोक बुधवारी मनापासून गणेशाची आराधना करतात, बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांचे सर्व दुःख दूर करतात.
परंतु कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो, म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते. पण श्री गणेशाची पूजा करताना काही गोष्टी आपण अर्पण करतो त्याविषयी विशेष काळजी घेतली पाहिजे. नाहीतर हसमूख असणारे गणपती बाप्पा आपल्यावर रागवतात. त्यामुळे श्री गणेशाच्या पूजेमध्ये या गोष्टी अर्पण करू नका.
Read Also : आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल
गणेशाच्या पूजेत अक्षदा म्हणजेच तांदूळ अर्पण केला जातो. त्यामुळे अक्षदा अर्पण करताना तो खंडित होऊ नये, याचे भान ठेवावे. गणेशाला अर्पण करण्यापूर्वी अक्षदाला थोडेसे ओले करून ते अर्पण करावे. कारण श्रीगणेशाचा एक दात तुटला आहे. त्यामुळे त्यांना ओला भात ग्रहण करणे त्यांना सोपं असतं. गणपतीला अक्षदा अर्पण केल्याने माणसाच्या सर्व अडचणी दूर होतात.
गणपतीच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर करू नये. पौराणिक कथेनुसार, गणेशजींनी तुळशीजींचा विवाह प्रस्ताव नाकारला होता. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यावर तुळशीला राग आला आणि तिने गणेशजींना दोन लग्नाचा शाप दिला. यावर श्री गणेशाने तुळशीलाही शाप दिला होता, तुळशीचा विवाह एका असुराशी होईल. याघटनेपासून श्रीगणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले जाते.
गणेशजींना पांढरे फूल किंवा केतकीचे फूल अर्पण करू नका, पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाला केतकीची फुले आवडत नाहीत. असे मानले जाते की या कारणास्तव केतकीचे फूल गणपतीला अर्पण करू नये.
Read Also : तिसऱ्या T20 सामन्यामध्ये चमकला सूर्यकुमार ठोकल्या 76 धावा
श्री गणेशाच्या पूजेत वाळलेली आणि शिळी फुले अर्पण करू नये. वाळलेल्या फुलांचा वापर करणे अशुभ मानले जाते, असे केल्याने कुटुंबात गरिबी राहते. त्यामुळे पूजेच्या वेळी गणेशाला ताजी फुलेच अर्पण करावीत.
गणेशाच्या पूजेत पांढरे वस्त्र, पांढरा धागा आणि पांढरे चंदन अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार, चंद्राने गणेशजींची विटंबना केली होती, म्हणून गणेशजींनी चंद्राला शाप दिला. पांढऱ्या फुलांचा किंवा वस्तूंचा संबंध चंद्राशी असल्याने गणेशाला पांढरी फुले अर्पण केली जात नाहीत.