तब्बल २२ तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, मुंबईसह राज्यभरात बाप्पांना भावपूर्ण निरोप

Ganpati bappa Visarjan: गेले ११ दिवस सुरु असलेल्या गणेशोत्सवाची सांगता झाली आहे. गुरुवारी सकाळपासूनच मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली.

lal baug_twitter
लालबागच्या राजाचं विसर्जन (फोटो सौजन्य: लालबागचा राजा)  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

 • बाप्पा चालले गावाला, चैन पडेना आम्हाला 
 • पुढच्या वर्षी लवकर या! च्या जयघोषात गणपती बाप्पाला निरोप
 • लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात 

मुंबई: मुंबईसह राज्यभरात आज दहा दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत गुरुवार सकाळपासूनच बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली. मुंबईचा राजा अशी ओळख असलेल्या गणेशगल्लीच्या गणपतीची आरतीसंपन्न झाली आणि त्यानंतर त्याच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली. त्यापाठोपाठ लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली. दरम्यान, त्याआधी येथील स्थानिक कोळी महिलांनी बाप्पाच्या आरतीनंतर काही वेळ पारंपारिक वाद्यांवर ठेका देखील धरला. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही जवळजवळ २२ तास सुरु होती. तब्बल २२ तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन (शुक्रवारी) गिरगाव चौपाटीवर करण्यात आलं. 

गेले ११ दिवस जल्लोषात सुरु असलेल्या गणेशोत्सवाची काल (गुरुवार) सांगता झाली. त्यामुळे काल मुंबईसह संपूर्ण राज्यभरात लाखो गणपतींचं विसर्जन पार पडलं. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन होत असल्याने प्रशासनाने देखील त्यासाठी जय्यत तयारी केली होती. मुंबईतील अनेक चौपट्या, तलावात विसर्जन करण्यात आलं. त्यामुळे प्रशासनाने या सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था देखील ठेवली होती. तसंच चौपट्यांवर मोठ्या प्रमाणात जीवरक्षक आणि मोटार बोट या देखील तैनात करण्यात आल्या होत्या. 

 1. तब्बल २२ तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन 
 2. विशेष बोटीतून लालबागच्या राजा विसर्जनासाठी खोल समुद्रात रवाना 
 3. लालबागच्या राजाच्या शेवटच्या दर्शनासाठी गिरगाव चौपाटीवर जनसागर 

पाहा लालबागच्या राजाचं विसर्जन LIVE:

 

 

 

अपडेट

 1. वाजत गाजत सर्व नागरिकांना गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला
 2. गणपती विसर्जनासाठी पाण्यात उतरलेले चार जण बुडाले, अमरावती जिल्ह्यातील पूर्णा नदीपात्रात घडली घटना
 3. लालबागचा राजा गणेशोत्सवाची मिरवणूक भायखळा परिसरात दाखल
 4. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील गणपती बाप्पाचं पर्यावरणपूरक विसर्जन 
 5. गणेश गल्लीच्या राजाचं विसर्जन
 6. थोड्याच वेळात गणेश गल्लीच्या राजाचं विसर्जन
 7. गणेश गल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
 8. पुण्यात मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन 
 9. पुण्यात मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनात चंद्रकांत पाटील सहभागी झाले 
 10. लालबागचा राजा आणि गणेशगल्लीचा राजा समोरासमोर 
 11. कसबा गणपतीची मिरवणूक अलका चौकात दाखल 
 12. कसबा गणपती पुण्यातील मानाचा पहिला गणपती
 13. गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी 
 14. नागरिकांना विसर्जनादरम्यान सावध राहण्याचं पोलिसांकडून आवाहन 

विसर्जनादरम्यान कोणत्याही अप्रिय घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय सीआरपीएफ, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक हे देखील तैनात असणार आहे. तसंच विसर्जनाच्या ठिकाणी काही एनजीओंची देखील मदत घेतली जाणार आहे. ज्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास बरीच मदत होईल. 

 

 

बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी अनेक ठिकाणचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर काही मार्ग हे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. दुसरीकडे गणेश विसर्जनासाठी आज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर काही विशेष गाड्या देखील सोडण्यात येणार आहेत. ज्यामुळे गणेश भक्तांना मुंबईत येणं सोयीस्कर होणार आहे. 

पुण्यातही विसर्जन मिरवणूक जल्लोषात 

मुंबईसह पुण्यातही मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकांची सुरुवात ही मानाच्या गणपतींपासून होते. पुण्यात पांरपारिक ढोल ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो. येथील विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...