नवी दिल्ली: Budh Gochar 2022, Surya Gochar 2022, Shani Gochar 2022 Effect: बुध ग्रहानं (Mercury) आज कन्या (Virgo) राशीत प्रवेश केला आहे. आता बुध ग्रह येत्या 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत कन्या राशीमध्ये राहणार आहे. तर चार दिवसांपूर्वी सूर्यानं राशी बदलून सिंह राशीत प्रवेश केला. याशिवाय न्यायाची देवता शनीनं (Shani) देखील यावेळी आपलं स्थान बदलून मकर राशीत प्रवेश केला आहे. अशा प्रकारे या 3 महत्त्वाच्या ग्रहांची त्यांच्या स्वतःच्या राशींमध्ये उपस्थिती असणं दुर्मिळ ग्रह परिस्थिती निर्माण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य, बुध आणि शनि यांचे स्वतःच्या राशींमध्ये एकत्र असणे विशेष आहे. यामुळे काही राशींवर त्याचा खूप सकारात्मक आणि चांगला प्रभाव पडेल.
या राशींचे सुरू झाले चांगले दिवस
मिथुन राशी:
मिथुन राशीच्या लोकांसाठी ही ग्रहस्थिती अतिशय शुभ आहे. रवि राशीच्या वास्तव्यात त्यांना करिअर आणि व्यवसायात चांगले यश मिळणार आहे. या काळात या राशीच्या लोकांचं शौर्य आणि आत्मविश्वास उंचावर राहील. राजकारणात सक्रिय लोकांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला पश्चात सन्मान मिळेल. धनलाभ होईल. दरम्यान आरोग्यसंबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
कर्क राशी:
कर्क राशीच्या लोकांना सूर्य, शनि आणि बुधची स्थिती लाभदायक ठरणार आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात कोर्टात अडकलेली प्रकरणे निकाली निघतील. गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी हा चांगला काळ आहे.
तूळ राशी:
तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्य, बुध आणि शनीची सध्याची स्थिती शुभ आहे. त्यांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. परदेश प्रवासाचे नियोजन होईल. ज्यांचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यापाऱ्यांचे मोठे सौदे निश्चित होण्याची शक्यता आहे.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. Times Now Marathi त्याची पुष्टी करत नाही.)