Importance of Buying Gold on Gudi Padwa: गुढीपाडव्याच्या दिवशी 'गजकेसरी योग', जाणून घ्या या काळात सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

Importance of buying Gold on Gudi Padwa: गुढीपाडव्याला मराठी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी सर्वजण गुढी उभारतात तसेच नव्या वस्तू खरेदी करतात, सोने खरेदी सुद्धा करतात. तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त काय आहे.

Gudi padwa 2023 auspicious time to buy gold on hindu new year importance of buying jewellery on this day read in marathi
गुढीपाडव्याला सोने खरेदी करताय?वाचा सोने खरेदीचा शुभ मुहूर्त 
थोडं पण कामाचं
  • गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात
  • नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोने खरेदीला ग्राहकांची पसंती
  • जाणून घ्या गुढीपाडव्याला सोने खरेदी का करतात आणि सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त काय आहे

Importance of buying Gold on Gudi Padwa: भारतात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व असते आणि सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत असतात. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या गुढी उभारून नागरिक नववर्षाचा पहिला दिवस साजरा करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व असते.

गुढीपाडव्याच्या दिवशी एकदी एक ग्रॅमचे का होईना पण सोने खरेदी करण्याला नागरिक प्राधान्य देत असतात. तर काहीजण मोठ्या दागिन्यांची खरेदी करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करणं लाभदायक आणि शुभ मानलं जातं. तुम्ही सुद्धा गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या या गुढीपाडव्याला सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे. 

हे पण वाचा : हात-पाय सुन्न होणे गंभीर आजाराचे लक्षण?

ज्योतिषांच्या मते, यावर्षी गुढीपाडव्याला ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीकोनातून विशेष महत्त्व आहे. कारण, या दिवशी गुरू हा मीन राशीत आणि चंद्र शुक्ल पक्षात प्रवेश करत आहे आणि त्यामुळे उत्तम योग तयार होत आहे. मीन राशीत गुरू आणि चंद्राचा संयोग यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. गजकेसरी योग हा सर्वोत्तम योगांपैकी एक मानला जातो.

हे पण वाचा : सकाळी रिकाम्या पोटी काळा चहा पिण्याचे 5 जबरदस्त फायदे

गजकेसरी योग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी योग हा कुंडलीतील शुभ योगांपैकी एक आहे. या योगाच्या निर्मितीमुळे त्या काळात राशीसाठी धन आणि लाभ याचे बलवान योग तयार होतात. या सर्वांमुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते, व्यवसायात भरभराट होते, प्रगती होते. व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र हा पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि 10व्या घरात असताना गजकेसरी योग तयार होतो.

हे पण वाचा : तुम्हीही सकाळी ब्रश न करता खाता? वाचा काय आहेत त्याचे तोटे

गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

चैत्र प्रतिपदा प्रारंभ - 21 मार्च 2023 रोजी रात्री 10.52 वाजता

चैत्र प्रतिपदा समाप्त - 22 मार्च 2023 रोजी रात्री 8.20 वाजता

उदय तिथीनुसार 22 मार्च 2023 रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे.

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त - सकाळी 6.29 वाजल्यापासून ते 7.39 वाजेपर्यंत

गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करणं खूपच शुभ मानले जाते. कारण, या दिवशी सोने खरेदी केल्यास लाभदायक मानतात. या दिवशी कोणत्याही वेळेत तुम्ही सोने खरेदी करू शकता.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी