Guru Purnima Marathi Wishes : मुंबई : आज १३ जुलै २०२२ रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. आषाढ महिन्याती पौर्णिमा गुरूपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या पौर्णिमेला व्यासपौर्णिमाही म्हणतात. व्यासांनी महाभारत लिहिले, व्यास गुरुंचेही गुरू मानले जातात. म्हणून या दिवशी व्यासांची, दीक्षा गुरू तसे आई वडिलांची पुजा करून त्यांना वंदन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपण गुरूकडून विद्या मिळवतो म्हणून गुरूला गुरू दक्षिणा देऊन त्यांचे आशिर्वाद घेतल्याने विद्या सफल होते अशी श्रद्धा आहे. फक्त हिंदूच नव्हे तर बौद्ध आणि जैन धर्मियांतही गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. याच दिवशी गौतम बुद्धाने धर्मचक्रपरिवर्तन केले. जैन लोकही या दिवशी उपवास करून जिनपूजा करतात म्हणून हिंदू, बौद्ध व जैन धर्मांत ह्या दिवसास विशेष महत्त्व आहे.
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
गुरुविण कोण दाखविल वाट,
आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्य़ासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा