Guru Ravidas Jayanti: कोण होते संत रोहिदास? जाणून घ्या त्यांच्याबाबत सर्वकाही अन् त्यांचे अनमोल विचार

Sant Rohidas Jayanti 2023: प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेच्या दिवशी संत रोहिदास जयंती साजरी करण्यात येते.

Guru Ravidas jayanti 2023 you should know about sant rohidas quotes in marathi
Guru Ravidas Jayanti: कोण होते संत रोहिदास? जाणून घ्या त्यांच्याबाबत सर्वकाही अन् त्यांचे अनमोल विचार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • यंदा 5 फेब्रुवारी रोजी संत रोहिदास जयंती
  • दरवर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी साजरी होते गुरू रोहिदास जयंती

Sant Rohidas Jayanti Importance in marathi: दरवर्षी माघ शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथीच्या दिवशी संत रविदास जयंती साजरी करण्यात येते. यंदाच्या वर्षी 5 फेब्रुवारी रोजी रविदास जयंती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी संत रविदास यांचे अनुयायी, भक्त मोठ्या संख्येने एकत्रित येत विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. भजन-कीर्तन करतात. (Guru Ravidas jayanti 2023 you should know about sant rohidas quotes in marathi)

Ravidas, Rohidas Jayanti : कोण होते संत रोहिदास / रविदास

संत रोविदास यांना महाराष्ट्रात संत रोहिदास म्हणून ओळखले जाते. त्यांच्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी त्यांचे भक्त मोठ्या प्रमाणात रोहिदास जयंती साजरी करतात. संत रोहिदास यांचा जन्म उत्तरप्रदेशातील मांडूर गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव रघू आणि आईचे नाव घुरविनिया असे होते. ते चर्मकार समाजाचे होते. त्यांचे वडील हे चामड्याचे व्यवसाय करत होते.

हे पण वाचा : मोतीबिंदू टाळण्यासाठी घरगुती अन् सोपा मार्ग

संत रोहिदास यांना ईश्वरभक्तीची प्रचंड आवड होती. संत रोहिदास यांची भक्ती भावना पाहून स्वामी रामानंद यांनी त्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकार केलं. संत रोहिदास यांनी भजन, भक्तीगीते लिहिले.

हे पण वाचा : खोकल्यावर घरगुती आणि रामबाण उपाय

Sant Rohidas Jayanti Importance

संत रोहिदास जयंतीच्या दिवशी मंदिर, मठांमध्ये कीर्तन-भजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अनेक ठिकाणी रॅली काढण्यात येतात, ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यावेळी संत रोहिदास यांची जीवनकथा सांगितली जाते.

हे पण वाचा : भारतात हा तांदूळ सर्वात जास्त खाल्ला जातो

Sant Rohidas quotes in marathi संत रोहिदास यांचे अनमोल विचार

  1. सर्वांची सेवा करणारा खरा राजा आहे, सिंहासनावर बसणारा नाही.
  2. समानता हा मानवतेचा सुगंध आहे, जेव्हा सर्व प्राणी समान आहेत तेव्हा ते उद्भवते.
  3. जो मानवतेची सेवा करतो, देवाची सेवा करतो तोच मोक्ष प्राप्त करतो.
  4. खरी संपत्ती प्रेम आणि करुणा आहे, बाकीचे जीवनाच्या मार्गावर फक्त एक ओझे आहे.
  5. नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे, ते सर्व महानतेचे मूळ आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी